Maharashtra Political News SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राजकीय वातावरण तापलं! मुंबईत आज ३ महत्वाच्या बैठका; आगामी निवडणुकांची रणनिती ठरणार?

Mahavikas Aaghadi& Mahayuti Meeting In Mumbai: आगामी निवडणूकांच्या दृष्टीने रणनिती ठरवण्यासाठी या बैठका महत्वाच्या असल्याचे बोलले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News: आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे राज्याच्या पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच मुंबईमध्ये (Mumbai) आज सत्ताधारी तसेच विरोधकांच्या तीन महत्वाच्या बैठका होणार आहेत. आगामी निवडणूकांच्या दृष्टीने रणनिती ठरवण्यासाठी या बैठका महत्वाच्या असल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra Political News)

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यातील महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) महत्वाची बैठक आज होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray), काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) या बैठकीला उपस्थित मार्गदर्शन करणार आहेत.

महाविकास आघाडीमधील सर्व आमदार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबर किंवा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीबाबतही आज चर्चा होण्याची शक्यता आहे.

महायुतीचीही आज बैठक...

दरम्यान, महाविकास आघाडीसोबतच महायुतीचीही (Mahayuti) आज महत्वाची बैठक मुंबईत होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी महापालिका, विधानसभा निवडणूकांसंदर्भात यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच मंत्रीमंडळ विस्ताराबाबतही या बैठकीत चर्चा होवू शकते.

त्याचप्रमाणे या बैठकीनंतर भाजप पक्षाच्या आमदारांचीही स्वतंत्र बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपच्या (BJP) नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना बोलावण्यात आले आहे. तसेच पक्षातील प्रमुख नेते आणि आमदारही उपस्थित राहणार आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती

धार्मिकस्थळी नेत मोठ्या भावाकडून ३ वर्षीय बहिणीवर बलात्कार; घटना सीसीटीव्हीत कैद

Job Recruitment : एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियात ९०० हून पदासाठी भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Kalyan Tragedy: तो व्हिडिओ अखेरचा ठरला; काळू नदीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

Breakup: ब्रेकअपमुळे दु:ख नाही तर होतो फायदा; शिकायला मिळतात आयुष्याचे ५ महत्त्वाचे धडे

SCROLL FOR NEXT