Murum mining controversy: CM demands report, Ajit Pawar faces political heat. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मुरुम उत्खनन प्रकरणात अजित पवारांची कोंडी? मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल

Ajit Pawar in trouble over murum mining case: अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांची कोंडी झाल्याचं चित्र आहे. कारण माढा तालुक्यातील या प्रकरणाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांनी अहवाल मागवलाय. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

  • माढा तालुक्यात अवैध मुरूम उत्खनन प्रकरण उघडकीस आलं.

  • मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला.

  • या प्रकरणामुळे अजित पवारांची कोंडी झाल्याचं चित्र.

  • महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादळ उठण्याची शक्यता.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजली कृष्णा यांच्या फोनवरील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे माढा तालुक्यातील कुर्डू येथील मुरूम उपसा प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय बनलं आहे. कारवाईसाठी आलेल्या अंजली कृष्णा यांना अजित पवारांनी कारवाई थांबवण्यास सांगून दमबाजी केली होती. यावरुन राजकारणही तापलं आहे.

कारण अजित पवारांना फोन करणारा बाबाराजे जगताप राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष आहे. या घटनेनंतर अजित पवारांनी सारवासारव केली असली तरी आता मुख्यमंत्र्यांनी घटनेची दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांनी अहवाल मागितला आहे.

एकीकडे मुख्यमंत्र्यांनी रिपोर्ट मागवलाय तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र अजित पवारांचा रोखठोक स्वभाव असल्याचं सांगत पाठराखण केली आहे. या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे बाबाराजे जगताप यांचा अंमली पदार्थ पितानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर नितीन जगताप यांनी गावच्या मुख्य चौकात उभे राहून, बाबाराजे यांचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला शोधून त्याचा "कार्यक्रम" करणार असल्याची धमकी दिली. याचाही व्हिडिओही समोर आला आहे. यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत.

दरम्यान हे प्रकरण ताजं असतानाच 3 सप्टेंबरला अवैध उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांना मारहाण केल्या प्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तर दुसरीकडे तहसीलदारांची परवानगी न घेता जवळपास अर्धा एकर क्षेत्रातील 120 ब्रास मुरुम बेकायदेशीर पद्धतीने उपसा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी आता कुर्डू गावच्या सरपंच कुंताबाई चोपडे आणि ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs UAE : भारत दुबईत यूएईला भिडणार, हवामान अन् खेळपट्टीचा फायदा कोणाला होणार? वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update : ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावर, तर शिदेंचा वरळी डोममध्ये?

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात श्राद्धाला कावळा शिवला नाही तर काय करावे?

Pune Crime : पुण्यात भयंकर घटना, नराधम बापाचा पोटच्या मुलीवर ४ महिने अत्याचार; स्थानिकांनी फोडून काढलं

Risod Police : दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघेजण ताब्यात, आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT