
प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपीनी ड्रुग्सचे सेवन केले नसल्याचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट
या प्रकरणात सर्व आरोपींचे फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली होती.
ड्रग्स सेवन कारण्यापूर्वी पोलिसांनी धाड टाकली असल्याची पोलिसांची माहिती.
पुणे शहरातील खराडी येथे झालेल्या कथित ड्रग्स पार्टी प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. ड्रग्सचं सेवन केलं म्हणून एकनाथ खडसे यांचे जवाई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती. आता त्यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला असून त्यात धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. पुणे पोलिसांना हा फॉरेन्सिक रिपोर्ट मिळालाय.
प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर आरोपींनी ड्रग्सचे सेवन केले नसल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे आता प्रकरणाला वेगळे वळणं लागलंय. खराडी येथे झालेल्या कथित ड्रग्स पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली होती.
पार्टीत एकनाथ खडसे यांचे जवाई प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्सचं सेवन केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र आता रिपोर्टमध्ये वेगळाच खुलासा करण्यात आलाय. रिपोर्ट वेगळा आल्यानं पोलिसांनी आपल्या दाव्यावरून काहीसे घुमजाव केलंय. पार्टीमध्ये ड्रग्स सेवन करण्यापूर्वी पोलिसांनी धाड टाकली होती, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
आज पोलिसांना फॉरेन्सिक रिपोर्ट मिळाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर प्रांजल खेवलकर तुरुंगातून बाहेर आले. प्रांजल खेवलकर तब्बल दोन महिने येरवडा जेलमध्ये होते. फॉरेन्सिक अहवालामुळे आता या प्रकरणाची पुढील दिशा आणि कायदेशीर कार्यवाही कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
पुण्यातील खराडी भागातील एका हॉटेलमध्ये हाऊस पार्टी झाली होती. ही घटना २७ जुलै रोजी घडली होती. या पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण ८ जणांना अटक करण्यात आली होती. पार्टीच्या ठिकाणी पोलिसांना काही प्रमाणात अंमली पदार्थ आढळले होतं. त्यामुळे खेवलकर यांच्यासह इतरांवर अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.