राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर १० व्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. आज महायुतीच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीमधील कोणता आमदार मंत्री होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
महायुतीमधील भाजपचे जे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यांची नावं समोर आली आहेत. भाजपकडून २० आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सर्व आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन गेला आहे.
महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपकडे २१, शिवसेनेकडे १२ आाणि राष्ट्रवादीकडे १० खाती जाणार आहेत. भाजपचे कोण-कोण आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत ते आपण पाहणार आहोत...
- चंद्रशेखर बावनकुळे
- आशिष शेलार
- नितेश राणे
- शिवेंद्रराजे भोसले
- चंद्रकांत पाटील
- पंकज भोयर
- मंगलप्रभात लोढा
- गिरीश महाजन
- जयकुमार रावल
- पंकजा मुंडे
- राधाकृष्ण विखे पाटील
- गणेश नाईक
- मेघना बोर्डीकर
- अतुल सावे
- माधुरी मिसाळ
- आकाश फुंडकर
- अशोक उइके
- संजय सावकार
- जयकुमार गोरे
दरम्यान, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला १६ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. नागपूरमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
नागपूरमधील राजभवनामध्ये सायंकाळी ४ वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या शपविधी सोहळ्यामध्ये महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार शपथ घेतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.