Laxman Hake Criticized Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Laxman Hake On Manoj Jarange Patil: उमेदवार देणे आपलं काम नाही, त्यामुळे जरांगे यांनी थांबलं पाहिजे - लक्ष्मण हाकेंचा सल्ला

Maharashtra Assembly Election 2024: जरांगे पाटील यांनी राजकारणात येण्याच्या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगेंनी सलाईन घेऊन थांबावे असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Priya More

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे त्यांनी महायुतीसोबतच महाविकास आघाडीचे देखील टेन्शन वाढवले आहे. जरांगे पाटील यांनी राजकारणात येण्याच्या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगेंनी सलाईन घेऊन थांबावे असा खोचक टोला त्यांनी लगावला. तसंच उमेदवार देणे आपलं काम नाही असं म्हणत त्यांनी मनोज जरांगेंना सल्ला देखील दिला आहे.

'राजकारणात येऊन उमेदवार उभे करणे हे जरांगे पाटलांचे किंवा माझेही काम नाही. त्यामुळे त्यांनी सलाईन घेवून थांबले पाहिजे, असा सल्ला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. आज ब्रम्हपुरी येथे विजय वडेट्टीवार यांना शुभेच्छा देण्यासाठी लक्ष्मण हाके आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. 'आपण सामाजिक चळवळ चालवायची, राजकारण आपले काम नाही.', असेही त्यांनी सांगितले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन चांगलेच वाढवले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवण्याचा निर्धार केला होता. यासाठी अंतरवाली सराटीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती देखील ते घेत आहेत. मनोज जरांगेंनी मराठवाड्यातल्या बीडमधील १७ उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून हे सर्व उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बीड मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. याठिकाणी जरांगे पाटील यांनी उमेदवार मैदानात उतरल्यास प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Calf Muscles: या ६ एक्सरसाईज तुमच्या पायाचे मसल्स ठेवतील मजबूत

Maharashtra Politics: आता लवकरच 'ऑपरेशन टायगर 3'? शिवसेना खासदाराच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात वादळ उठलं

Hidden Hill Stations: ढगांवर बसून सैरसपाटा केल्यासारखा फिल, स्वर्गापेक्षा सुंदर या ६ थंड हवेच्या ठिकाणी करा पिकनिक प्लान

Maharashtra News Live Update: आजपासून पुणे ते शिर्डी थेट रेल्वे सेवा सुरू

ओठ काळे कधीच होणार नाहीत! रोज घरीच करा 'हे' ५ सोपे उपाय

SCROLL FOR NEXT