Manoj Jarange Patil : सगळे नेते मराठा समाजाला विचारू लागलेत चांगली गोष्ट; मनोज जरांगे पाटील

Sambhajinagar News : संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीच्या सरकारवर देखील निशाणा साधला आहे
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाज एकत्र झाल्याने सगळ्याच पक्ष्यातील येत आहेत. रात्री दोन वाजले की भाजपचे सुद्धा येऊ लागले आहेत. इतकेच नाही तर भाजपमधले तिकीट हुकलेले ते तर जॉईन झाले आहेत. आम्ही ताकतीने बलाढ्य होतो. मात्र आम्हाला गिणीत नव्हते. आता मात्र गोरगरीब मराठ्यांच्या चपलासकट पाया पडत आहेत. आज सगळे नेते मराठ्यांना विचारायला लागले ही चांगली गोष्ट असल्याचे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. 

संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीच्या सरकारवर देखील निशाणा साधला आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितले कि, चंद्रकांत दादा यांचे काही चुकूले नाही. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली, शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला, शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावल्या, मराठ्यांना आत्महत्या कराराला लावल्या. धनगर समाजाला आरक्षण दिले. मराठ्यांना आरक्षण न देता ओबीसींना दिलं हे चांगलं काम केलं. मराठ्यांना SCBC आरक्षण देऊन EWS घातलं छान काम आहे. मराठ्याच्या पोरावर केस केल्या; असे म्हणत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावत देवमाणूस आहे. दादा शेंदूर लावायला, पाहिजे कोणी फक्त दादाला शेंडी ठेवली पाहिजे उघडी; असेही ते म्हणाले. 

Manoj Jarange Patil
Chandrapur News : अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपमध्ये दाखल; उमेदवारीही निश्चित

३० तारखेला ठरणार उमेदवार 

मराठा समाजाच्या उमेदवारीबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, कि तिसऱ्या पाहरी सांगायला मी देवेंद्र फडणवीस आहे का? इकडं जुळलं की तिकडे सांगणार. उद्यापासून ३० तारखेपर्यंत कोणी इकडे येऊ नका. आपण ३० तारखेला सांगणार आहोत. तुम्हा सगळ्यांना फॉर्म भरायला सांगितले आहेत. ३० तारखेला किंवा जास्तीत जास्त १ तारखेला आपला निर्णय ठरेल. 

Manoj Jarange Patil
Akola News : मुर्तीजापुरमध्ये पुन्हा भाजपच्या २०० कार्यकर्त्यांचा राजीनामा; विद्यमान आमदारांना तिकीट नसल्याच्या चर्चेने नाराजी

फडणवीस यांच्यामुळे बीजेपी संपेल 

देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी, शहा यांना तिसरच सांगितल आहे. तिथे धनगर खुश नाही, ओबीसी खुश नाही आदिवासी खुश नाही शेतकरी देखील खुश नाही. देवेंद्र फडणवीस घरात बसून गणित मांडत आहे. म्हणून वाटतं हा माणूस खूप छान आहे. फक्त देवेंद्र फडणवीस याच्यामुळे या राज्यातील भाजप संपेल दुसरे कोणामुळे नाही; असा आरोप देखील त्यांनी केला. आम्ही आरक्षण मागितलं आम्हाला दिल नाही, आमच्या डोळ्यादेखत ओबीसींना दिल. फडणवीस मस्तीत जगणारा माणूस आहे. मराठ्याला खुन्नस दिली आता मराठा जुमानत मानत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com