shahaji bapu patil saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पुण्यात सांगोल्याच्या कारमधून ५ कोटी जप्त, राऊतांच्या आरोपावर शहाजी पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले 'माझ्याविरोधात....'

Shahaji Bapu Patil: राज्यातील ठाकरे सरकार कोसळल्यापासून संजय राऊत यांना शहाजी बापू पाटीलच दिसत आहेत.

Priya More

भारत नागणे, सोलापूर

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर एका वाहनांमध्ये पाच कोटी रुपयांची रोकड आढळून आली आहे. ही रक्कम सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे असल्याी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. यावर आमदार शहाजी बापू पाटील यांनी सम टीव्हीला आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे.

शहाजी बापू यांनी सांगितले की, 'राज्यातील ठाकरे सरकार कोसळल्यापासून संजय राऊत यांना शहाजी बापू पाटीलच दिसत आहेत. या गाडीशी , यामध्ये सापडलेल्या पैशांशी किंवा त्या कार्यकर्त्यांशी माझा काहीही संबंध नाही.', असा खुलासा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. तसंच, 'सांगोला मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याने माझ्याविरुद्ध राजकीय षडयंत्र रचले जात आहे.', असा आरोप देखील शहाजी पाटील यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता असताना पुण्यात ५ कोटी रुपयांची रोख रक्कम घेऊन जाणारी कार पोलिसांनी पकडली. ही कार मोठ्या नेत्याचा असल्याचा आरोप केला जातोय. पुणे-बंगळुरु महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी रात्री उशिरा ही कारवाई करत कारमधील पैसे आणि कार पोलिसांनी जप्त केली. या घटनेमुळे राज्यामध्ये खळबळ उडाली आहे.

पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी रक्कम जप्तकेली पण ज्यांच्याकडे रक्कम होती त्यांच्याकडे चौकशी करुन त्यांना सोडून दिले. पैसे जप्त केल्यानंतर पोलिस चौकीत ही रक्कम नेण्यात आली आणि निवडणूक विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी आणि इन्कम टॅक्सच्या अधिका ऱ्यांना पोलिस ठाण्यात कारवाईसाठी पाचारण करण्यात आलं. मात्र त्यानंतर कारवाईची माहिती गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिंदे गटाच्या आमदारावर आरोप केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Exclusive : कौल महाराष्ट्राचा : विधानसभा निवडणुकीतलं सर्वात पहिलं 'साम'चं सर्वेक्षण

Maharashtra News Live Updates: निलेश राणे उद्या शिवसेनेत करणार प्रवेश

VIDEO : कुर्ला, चुनाभट्टीमध्ये भाजपला धक्का; 1 हजार कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Sharp Eyes: तुमची दृष्टी तीक्ष्ण करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

SCROLL FOR NEXT