Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal Saam Digital
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: जरांगेंची निवडणुकीतून माघार, छगन भुजबळांची दोन वाक्यात प्रतिक्रिया,विषय संपवला!

Chhagan Bhujbal On Monoj Jarange Patil: छगन भुजबळ यांनी यावेळी जरांगे पाटील यांच्यावर टीका न करता त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं स्वागत करतो असे मत त्यांनी व्यक्त केले.

Priya More

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. जरांगे पाटील यांच्या या निर्णयानंतर काही राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली तर काहींनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ हे नेहमी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. पण छगन भुजबळ यांनी यावेळी जरांगे पाटील यांच्यावर टीका न करता त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं स्वागत करतो असे मत त्यांनी व्यक्त केले.

छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेबद्दल प्रतक्रिया देताना सांगितले की, 'जरांगे यांच्या निर्णयाचं स्वागत आहे. देर आये दुरुस्त आये. एका समाजावर निवडणुका लढवल्या जात नाहीत. मराठा बांधव मोकळेपणाने मतदान करू शकतील. कुठलही दडपण राहणार नाही. सर्व पक्षांचे ६०-७० टक्के उमेदवार मराठा आहेत. जरांगे यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे.'

छगन भुजबळ यांनी पुढे सांगितले की, दलीत आणि मुस्लिम यादीबद्दल त्यांनी जे म्हटलंय त्यावर काय म्हणणार. सर्व धर्मीय आणि समाजाचा पाठिंबा हवा आहे. असा त्याचा अर्थ आहे. पक्ष असतात त्यांचा प्रयत्न असतो सर्व धर्मीय आणि समाज सोबत घेण्याचा.' तसंच, 'आंदोलन हा भाग वेगळा आहे. मी समता परिषदेचे काम करतो. सामाजिक काम वेगळं आहे. समता परिषद निवडणूक लढवत नाही. सामाजिक संस्थेचा आहे म्हणून मतदान करा असे होत नाही. त्यांचे काम ते करतील त्रुटी सांगत राहतील. महाराष्ट्रातील निवडणुका मोकळ्या पद्धतीने होतील. सामाजिक सलोखा राहील असे वाटते. सगळे उमेदवार मोकळेपणाने भूमिका मांडतील. ', असे छगन भुजबळांनी सांगितले.

शिंदेंचे उमेदवार नॉट रीचेबल आहेत यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, 'महायुतीचे शिरस्त नेते विचार करतील. नॉट रीचेबल आहे हे तुम्हीच सांगत आहे.' तर 'सामाजिक संस्थांचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व पक्षाचा पाठिंबा लागतो. निवडणुकीत सगळ्यांचा पाठिंबा लागतो तो सामाजिक संस्थांना मिळतोच असे नाही. राजकीय पक्षांना तसा पाठिंबा असतो.', असे देखील भुजबळांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

SCROLL FOR NEXT