बुलडाणा जिल्ह्यातील मलाकपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली. या मतदारंसघामध्ये काँग्रेस की भाजपचं कोणाचं पारडं जड आहे? या मतदारसंघामध्ये कोण आमदार होणार हे उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर कळणारच आहे. सकाळचा एक्झिट पोल समोर आला असून त्यामध्ये या मतदारसंघामध्ये कोण विजयी होणार हे सांगितले आहे.
सकाळच्या एक्झिट पोलनुसार, मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे पारडं जड दिसत आहे. या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे राजेश एकडे यांनी निवडणूक लढवली. तर महायुतीमधील भाजपच्या सुखचैन संचेती यांनी निवडणूक लढवली. पण या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे राजेश एकडे हेच संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या राजेश एकडे यांनी भाजपच्या सुखचैन संचेती यांचा पराभव केला होता. या निवडणुकीमध्ये सुखचैन संचेती हे पाचव्यांदा निवडणूक लढवत आहेत. आता दोघे पुन्हा आमने-सामने आले आहेत. राजेश एकडे यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात मतदारसंघामध्ये खूप चांगली कामं केली आहेत. त्यामुळे मतदारांकडून त्यांनाच जास्त पसंती मिळत असल्यामुळे तेच आमदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.