Shrinivas Pawar on Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Shrinivas Pawar on Ajit Pawar: अजितदादांनी राजकारणात फॅमिली आणू नये, भाऊ श्रीनिवास पवारांचा सल्ला

Maharashtra Assembly Election 2024: बारामतीमध्ये महायुतीने अजित पवारांना उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोघांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

बारामतीमध्ये काका-पुतण्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा सामना रंगणार आहे. बारामतीमध्ये महायुतीने अजित पवारांना उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोघांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे बारामतीमध्ये आता पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणा आहे. अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना 'माझी आई सांगत होती की माझ्या अजितदादा विरोधात अर्ज भरू नका, पण तरीही घरातून उमेदवारी अर्ज दाखल झाला.', असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता त्यांचे भाऊ आणि युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'अजितदादांनी राजकारणात फॅमिली आणू नये.', असा सल्ला श्रीनिवास पवार यांनी दिला आहे.

श्रीनिवास पवार यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले की, 'बारामतीची निवडणूक विकासावर कराना कशाला कौटुंबिक करता? विकासाच्या मुद्द्यावर बोललं जात नाही पण कुटुंबावर का बोलायचं? अजितदादांनी राजकरणात फॅमिली आणू नये. दादांनी फॅमिलीला मध्ये आणू नये. विकास कमकुवत झाला म्हणून कुटुंबावर बोलायचं का? अजित पवारांनी रोहित पवारांची चेष्टा केली होती पण त्यावर ना रोहित बोलला ना युगेंद्र बोलला. त्याने रोहितची चेष्टा केली म्हणून आमच्या घरातील तसं कोणी करणार नाही. आमच्याकडे कोणीच रोहित पवारबद्दल बोलले नाही. सुप्रिया सुद्धा बोलणार नाही, त्यांनी काल पण चेष्टा केली. ४ चं महिने झालेत, दादा फोन करतायेत, सुप्रिया नाही करत. बारामतीची जनता सुज्ञ आहे. २३ तारखेला कळेल काय निकाल लागतो ते.'

तर युगेंद्र पवार यांनी सांगितले की, 'मी काल भावनिक झालो होतो. मला भरून आलं कारण शरद पवारसाहेब माझा फॉर्म भरण्यासाठी आले होते. पवारसाहेब माझ्यासाठी आयुष्यभर रोल मॉडेल असणार, मी त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही. जेव्हा फूट पडली तेव्हा आमच्या कुटुंबाला आवडलं नाही. पवारसाहेबांना पण त्रास झाला ते ज्येष्ठ नेते आहेत. पक्षात पडलेली फूट मला नातू म्हणून तर ते कधीच आवडलं नाही. अजित पवारांच्या भाषणाच्या बद्दल बोलणारा मी एवढा मोठा नाही.' तसंच, 'माझ्या आजीशी माझं वेगळं नातं आहे. लहानपणापासून मी त्यांच्याजवळ आहे. आजींना राजकारणात आणणं चुकीचं आहे. माझी विनंती आहे आजींना यात आणू नका. लोकसभेला सुद्धा कौटुंबिक मुद्द्यांवर बोलले गेले पण ते नाही झालं पाहिजे. कौटुंबिक संबंध तुटले आहेत हे मी मान्य करत नाही. दादा भाजपसोबत गेले पण आमच्या कुटुंबीयांनी भाजपला कधीच साथ दिली नाही.', असे युगेंद्र पवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT