Karuna Munde On Dhananjay Munde Resign Saam Tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा? करुणा मुंडेचा मोठा दावा

Karuna Munde On Dhananjay Munde Resign : मंत्री धनंजय मुंडे विरोधकांच्या टार्गेटवर आहेत. त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा सातत्यानं मागितला जात आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे उद्या राजीनामा देतील असा दावा केलाय.

Girish Nikam

Dhananjay Munde Resign : बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे गेल्या दोन महिन्यांपासून विरोधकांच्या टार्गेटवर आहेत. त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा सातत्यानं मागितला जात आहे. सरपंच हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचं CIDनं आरोपपत्रात म्हटलं आहे....तर कराड निकटवर्तीय असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली होती. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यातच आता अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे उद्या धनंजय मुंडे राजीनामा देणार असा खळबळजनक दावा त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केलाय. करुणा मुंडेंच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

कराड अडकला, मुंडे गोत्यात?

- सरपंच हत्या प्रकरणाचा कराड मास्टरमाईंड, CIDचा आरोप

- कराड निटकवर्तीय असल्याची धनंजय मुंडेंचीच कबुली

- कराडला मुंडेंचा पाठबळ असल्याचा विरोधकांचा आरोप

- कराडांशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नसल्याचं पंकजा मुंडेंचं विधान

- कराड- मुंडेंच्या व्यावसायिक संबंधाचे दमानियांचे आरोप

दुसरीकडे विरोधकही धनंजय मुंडेंविरोधात चांगलाच आक्रमक झालेत. विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. तत्कालीन कृषीमंत्री असताना केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप आणि सरपंच हत्या प्रकरणात वाल्मीक कराडबरोबर सख्य असल्यानं अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे वादात सापडलेत. दुसरीकडे बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनाही नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.त्यामुळे राष्ट्रवादीच्या या दोन मंत्र्यांवरुन विरोधक अधिवेशनात सरकारवर तुटून पडणार हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT