Maharashtra Politics : आनंद आश्रम हा एकनाथ शिंदेंचा राजकीय कोठा, ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान

Anand Ashram Thane : ठाकरे गटाकडून आज ठाण्यात संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यापूर्वी ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांच्या समोर आले. ठाण्यात दोन्ही गटाच्या शिवसैनिकांमध्ये राडा झाला.
Anand Ashram Uddhav thackeray
Anand Ashram Uddhav thackeraySaam Tv
Published On

Eknath Shinde Anand Ashram : आनंद दिघेचं आनंद आश्रम हे आश्रम राहिलेलं नाही, दिघेंनंतर तेथे एकनाथ शिंदेंचा राजकीय कोठा झाला आहे असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संवाद मेळाव्याच्या निमित्ताने संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात, ठाण्यात आले होते.

ठाकरे गटाद्वारे आज ठाण्यात संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची मोठी फौज पाहायला मिळाली. मेळावा सुरु होण्याआधी ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाला भेट दिली. तेव्हा आनंद आश्रमाबाहेर ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्हीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Anand Ashram Uddhav thackeray
Beed Crime : आधी अपहरण केलं, मग अमानुष मारहाण; बीडमध्ये 'त्या' मायलेकासोबत काय घडलं?

याच दरम्यान संजय राऊत यांनी 'आनंद दिघेंच्या नंतर आनंद आश्रम हे शिंदेंचा राजकीय कोठा झाला आहे' असे म्हटले. एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रम नावावर केल्याचा राऊतांनी दावा केला आहे. ते म्हणाले, लोकांनी आम्हाला विचारलं तुम्ही आनंद आश्रमात गेला नाहीत. दिघे साहेबांच्या नंतर तो आनंद आश्रम राहिला नाही. तो शिंदेंचा राजकीय कोठा झाला आहे. ती जागा महाशयाने (एकनाथ शिंदे) आपल्या नावावर करुन घेतली आहे.

Anand Ashram Uddhav thackeray
Maharashtra Politics : महायुतीत बिनसल्याच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले, 'आमच्यात कोल्ड वॉर..'

संजय राऊत म्हणाले, 'आनंद आश्रमाची जी जागा आहे, ती जागा एका पारशाची होती, ती जागा पारश्याने आनंद दिघे यांना वापरायला दिली होती. त्या जागेवर एकनाथ शिंदे यांनी मालकी हक्क सांगितला आहे. आता अशा जागेवर आम्ही का जायचं?' संवाद मेळाव्यापूर्वी झालेल्या या हायव्होल्टेज ड्रामाची राजकीय वर्तुळीत मोठी चर्चा होत आहे.

Anand Ashram Uddhav thackeray
Maharashtra Politics : शिंदेंचा पक्ष, भाजपात विलीन? शिवसेना खासदाराच्या दाव्यानं खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com