Sujay Vikhe Patil Criticized Jayashree Thorat:  Saam Tv
महाराष्ट्र

Jayashree Thorat: कितीही टीका करा, मी हारणार नाही, जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया

Ahmednagar Assembly Election 2024: वसंत देशमुखांच्या या वक्तव्यावर जयश्री थोरात यांनी साम टीव्हीला पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी वसंत देशमुख यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.

Priya More

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत भाजपचे नेते वसंत देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. धांदरफळ येथे झालेल्या सभेमध्ये त्यांनी जयश्री थोरातांबाबत खालच्या पातळीवर टीका केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर अहमदनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून आंदोलन करत आहेत. वसंत देशमुखांच्या या वक्तव्यावर जयश्री थोरात यांनी साम टीव्हीला पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी वसंत देशमुख यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.

जयश्री थोरात यांनी सांगितले की, 'ते काय बोलतात. काहीच भान न ठेवता त्यांनी अतिशय खालची पातळी गाठत माझ्या मातृत्वावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले. त्यांचे विचार आणि त्या सभेचे वातावरण कसे असू शकते हे यावरून दिसते. हे अतिशय निंदनीय आणि कोणालाही न शोभणारे तिथे झाले आहे. मी हारणार नाही, मी थांबणार नाही. माझ्यावर कितीही टीका झाली असली तरी सुद्धा मला माहिती आहे मी कशी आहे. माझा सर्व परिवार कसा आहे हे मला माहिती आहे. जर मी थांबले ना तर पुढच्या माझ्या लहान बहिणींना कुठे थांबावे लागले तर असे विचार माझ्या मनात येतात. मी माझे पूर्ण प्रयत्न करेल आणि लढेल. या राजकारणाची पातळी कुठेही खाली घसरून मी देणार नाही.'

दरम्यान, जयश्री थोरात यांनी या वादग्रस्त वक्तव्यानंतर संगमनेर पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. पोलिस अधीक्षकांनी जयश्री थोरात यांना आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. आम्ही आरोपींना तत्काळ अटक करणार असे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी दिले. त्यांनी सांगितले की, 'मला आश्वासन नकोय कारवाई पाहिजे. गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कारवाई करा. मग आम्हाला जवाब द्या. २४ तासांत आरोपींना अटक झाली नाही तर पुन्हा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू. आमच्या स्वाभिमानाला ठेच पोहचविण्याचे काम सुजय विखे यांनी केलं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT