NCP (Sharad Pawar faction) leader Jayant Patil arrives for a meeting with Chief Minister Devendra Fadnavis Saam tv
महाराष्ट्र

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

Maharashtra Politics : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट एनडीएमध्ये (NDA) सामील होण्याबाबतच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Bharat Jadhav

  • जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

  • शरद पवार गटाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली.

  • वर्षा बंगल्यावर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचीही उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

शरद पवार गट एनडीएमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक मोठी राजकीय घडामोड झालीय. मंगळवारी सकाळी शरद पवार गटाच्या आमदारांच्या बैठक झाली. या बैठकीत भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर आता मंगळवार रात्री शरद पवार गटाचे प्रमुख नेते जयंत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसा वर्षा बंगल्यावर दाखल झालेत. विशेष म्हणजे त्याच्या आधी अजित पवार गट राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे हेदेखील वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत.

आधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत तटकरे, प्रफुल पटेल यांची बैठक चालू होती. त्याचदरम्या जयंत पाटील हे वर्षा बंगल्यावरील बैठकीसाठी आले आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीमागील नेमकं कारण आहे. त्यांच्या भेटीनंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT