Jayant Patil On Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित पवारांना आणखी एक धक्का? जयंत पाटील वळसे पाटलांच्या सासुरवाडीत; 'त्या' भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Maharashtra Assembly Election 2024: या भेटीबाबत बोलताना जयंत पाटील यांनीआज दिवंगत आमदार प्रकाश डहाके यांची जयंती असून त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आलो होतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Gangappa Pujari

मनोज जैस्वाल| वाशिम, ता. २० ऑगस्ट २०२४

विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा वाशिम जिल्ह्यामध्ये सुरू आहे. या दौऱ्यादरम्यान मोठी घडामोड घडली असून जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार प्रकाश डहाके यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

अजित पवारांना आणखी एक धक्का?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सध्या राज्यभर सुरू आहे. या यात्रेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार प्रकाश डहाके यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिवंगत आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी सईताई डहाके या कारंजा बाजार समितीच्या सभापती असून त्या सध्या राष्ट्रवादीत अजित पवार गटात आहेत.

जयंत पाटलांनी घेतली डहाके कुटुंबाची भेट!

तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील हे डहाके परिवाराचे जावई आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या भेटीबाबत बोलताना जयंत पाटील यांनीआज दिवंगत आमदार प्रकाश डहाके यांची जयंती असून त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आलो होतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

"कारंजाची जागा आम्ही पूर्वी पासून लढत आलो आहोत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या युतीमध्ये ही जागा आम्ही लढलो. त्यामुळे ही जागा शक्यतो आम्हीच लढू," असे सूचक विधान जयंत पाटील यांनी केले आहे. तसेच डहाके कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देणार का? असे पत्रकारांनी विचारले असता त्यावर आताच बोलणे योग्य नाही असेही जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, त्यांनी डहाके कुटुंबीयांची घेतलेली भेट आज जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'कुणासोबतही युती करा, पण भाजपसोबत..' शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, राष्ट्रवादीचे २ गट एकत्र येणार?

Appendix cancer: तरूणांनो, सतत पोटदुखी किंवा अपचनाचा त्रास होतोय? शोधूनही सापडत दिसत नाहीत अपेंडिक्सच्या कॅन्सरची लक्षणं

December Tourism: नुकतंच लग्न झालंय? हिवाळ्यात पार्टनरसोबत जा '5' ठिकाणी, हनिमूनसाठी परफेक्ट

Maharashtra Live News Update: डबल स्टार असलेल्या मतदारांना मतदान करता येणार नाही- निवडणूक आयोग

NABARD Recruitment: खुशखबर! नाबार्डमध्ये ग्रेड ए ऑफिसर पदांसाठी भरती; ८ नोव्हेंबरपासू करता येणार अर्ज; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT