Jayant Patil  
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा धक्का, जयंत पाटील भाजपच्या संपर्कात?

Jayant Patil : महायुती सरकारमध्ये 42 मंत्र्यांनी शपथ घेतलीय. मात्र अजूनही 1 मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आलंय. मात्र हे मंत्रिपद खरंच जयंत पाटलांसाठी रिक्त ठेवण्यात आलंय का? जयंत पाटील खरंच भाजपमध्ये प्रवेश करणार का? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Bharat Mohalkar

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळात 1 जागा रिकामी असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीतील दिग्गज नेता महायुतीत सहभागी होण्याची चर्चा रंगली होती. त्यातच आता जयंत पाटलांच्या आग्रहावरुन नितीन गडकरी हे राजाराम बापू शिक्षण संस्थेतील विकास कामांच्या भुमीपूजनासाठी सांगलीत येणार आहेत.. त्यामुळे जयंत पाटील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगलीय. जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडू शकतात ते पाहूयात.

जयंत पाटील भाजपात जाणार ?

राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदावरुन असलेला सुप्त संघर्ष

साखर कारखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत

विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य

मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य

मंत्रिमंडळातील खुणावत असलेलं 1 रिक्त मंत्रिपद

आर आर आबांनंतर जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या वाढीसाठी मोठं योगदान दिलं. मात्र २०१९ मध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष रंगला होता. त्यामुळे जयंत पाटील हे 2019 मध्येच भाजपसोबत जाण्याची चर्चा रंगली होती. मात्र अजित पवारांनी बंड केलं आणि त्य़ासोबत सत्तेचा संसार थाटला. आणि जयंत पाटलांचा पवारांसोबतचा प्रवास लांबला. मात्र आता प्रदेशाध्यक्षपदावरुन रोहित पवारांचा जयंत पाटलांसोबत संघर्ष चव्हाट्यावर आलाय.

तर दुसरीकडे जयंत पाटील भाजपात जाण्याची शक्यता असून त्यांचा भाजपला कसा फायदा होणार? पाहूयात. पवारांच्या राष्ट्रवादीत होणारी पक्षांतर्गत कोंडी आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्याची होत असलेल्या मागणीमुळे जयंत पाटील सत्तेच्या आश्रयाला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्याचीच पहिली वीट गडकरींच्या उपस्थितीत रचण्याचा तर्क वर्तवला जातोय.. मात्र जयंत पाटील सत्तेत सहभागी होऊन मंत्री बनणार की पवारांसोबत निष्ठा कायम ठेवणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT