Amol Mitkari on Jayant Patil: मंत्रिमंडळातील एक जागा जंयत पाटलांसाठी, अमोल मिटकरींच्या विधानाने भुवया उंचावल्या

Amol Mitkari on Jayant Patil: 'काही लोक नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. जयंत पाटील १०० टक्के महाविकास आघाडीमध्येच राहतील.' असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी अमोल मिटकरींच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं.
Amol Mitkari on Jayant patil
Amol Mitkari on Jayant PatilSaam Tv
Published On

शरद पवार यांचे विश्वासू नेते जयंत पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. ही चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरूय. मात्र, याच चर्चांवर अमोल मिटकरी यांनी भर दिली आहे. मंत्रिमंडळात एक जागा रिक्त आहे. त्या रिक्त जागेवर जयंत पाटील यांनाच संधी देण्यात येईल. असं अमोल मिटकरी म्हणाले. ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुंवया उंचावल्या आहेत.

१५ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या दरम्यान ३९ आमदारांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात शपथ घेतली. मात्र, एक जागा शिल्लक आहे, ती जागा नेमकी कुणासाठी राखीव आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर सुचक विधान अमोल मिटकरी यांनी दिलं आहे. 'अनेक जणांना शपथ घेता आली नाही. नाराजी साहजिक आहे. पण महामंडळावर अनेकांची बोळवण होईल.'

Amol Mitkari on Jayant patil
Amol Mitkari: ...याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता; अमोल मिटकरींचा रोहित पवारांना टोला

'आता एक मंत्रिपदरिक्त आहे. मागे पण एक मंत्रिपद जयंत पाटील यांच्यासाठी रिक्त ठेवण्यात आलं होतं. पण लोकसभेला मविआला चांगलीच मतं मिळाली, म्हणून त्यांनी विचार बदलला. विधानसभेत काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते की, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. माझी खात्री आहे की ते नक्की येतील. असं अमोल मिटकरी म्हणाले.

यावर 'काही लोक नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. जयंत पाटील १०० टक्के महाविकास आघाडीमध्येच राहतील.' असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी अमोल मिटकरींच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं.

Amol Mitkari on Jayant patil
Parth Pawar On Amol Mitkari: अमोल मिटकरींच्या भूमिकेशी पक्षाचा संबंध नाही, पार्थ पवार यांनी सुनावले खडेबोल

योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची निवड बिनविरोध करण्यात आली. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडताना विधानभवनात चांगलाच हास्यविनोद रंगला. विधानसभा अध्यक्षांचा कसा मान राखला जातो, त्यावर जयंत पाटलांनी १९९० सालीचा किस्सा सांगितला. ९० साली पहिल्यांदा मी अध्यक्ष झालो. त्यावर अजित पवार यांनी अध्यक्ष नाही, आमदार असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर सारवासारव करत त्यांनी वाक्य दुरूस्त केलं. किती बघा लक्ष आहे माझ्यावर, असं म्हणत पाटील यांनी टोला लगावला.

यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत, माझं लक्ष आहे, तुम्ही कधी प्रतिसाद देताय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावेळी 'योग्यवेळी योग्य निर्णय' असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलं.ज्यामुळं सभागृहात एकच हशा पिकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com