Parth Pawar On Amol Mitkari: अमोल मिटकरींच्या भूमिकेशी पक्षाचा संबंध नाही, पार्थ पवार यांनी सुनावले खडेबोल

Parth Pawar Criticized Amol Mitkari: अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरांवर टीका केली होती. या टीकेनतर पार्थ पवार यांनी ट्वीट करत अमोल मिटकरी यांना सुनावलं आहे.
Parth Pawar On Amol Mitkari: अमोल मिटकरींच्या भूमिकेशी पक्षाचा संबंध नाही, पार्थ पवार यांनी सुनावले खडेबोल
Parth Pawar Criticized Amol MitkariSaam T
Published On

विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान नरेश अरोरा यांचा अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी ट्वीट करत अमोल मिटकरी यांना सुनावले आहे.

अमोल मिटकरी यांनी अजित पवार आणि नरेश अरोरा यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटोवर टीका केली होती. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा फोटो पोस्ट करत नरेश अरोरा यांच्यावर टीका केली. पण काही तासांत त्यांनी हे ट्वीट डिलीट केले होते. पण तोपर्यंत त्यांचे हे ट्वीट व्हायरल झाले होते.

Parth Pawar On Amol Mitkari: अमोल मिटकरींच्या भूमिकेशी पक्षाचा संबंध नाही, पार्थ पवार यांनी सुनावले खडेबोल
Amol Mitkari: ...याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता; अमोल मिटकरींचा रोहित पवारांना टोला

अमोल मिटकरी यांनी या ट्विटमध्ये असे लिहिले होते की, 'पवार साहेबांच्या खांद्यावर हात ठेवायची कुणाची हिंमत झाली नाही. अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कोण कुठला बाहेरच्या राज्यातला माणूस येतो. त्याची पीआर कंपनी लाँच करण्यासाठी म्हणतो की हे आमचं यश आहे. मग ४१ आमदार निवडून आले ते, त्यांचे कार्यकर्ते, बूथ प्रमुख, सोशल मीडिया हे काय झोपत होते का?'त्यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तसंच यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा देखील रंगली.

Parth Pawar On Amol Mitkari: अमोल मिटकरींच्या भूमिकेशी पक्षाचा संबंध नाही, पार्थ पवार यांनी सुनावले खडेबोल
Parth Pawar: पार्थ पवारांना अडकवण्याचा प्लॅन? अनिल देशमुखांचा आणखी एक मोठा आरोप

अमोल मिटकरी यांच्या या ट्वीटवर आता पार्थ पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. पार्थ पवार यांनी देखील एक्सवर पोस्ट करत अमोल मिटकरी यांना चांगलेच फटकारले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले की, 'हे अत्यंत दुर्दैवी आहे. अमोल मिटकरी हे विधानपरिषदेचे आमदार असूनही त्यांनी डिझाईन बॉक्स आणि नरेश अरोरा यांच्याबाबत पक्षविरोधात भूमिका घेतली आहे. माझा पक्ष आणि माझे वडील आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार अशाप्रकारच्या अमोल मिटकरी यांच्या कोणत्याही मतांचे समर्थन करत नाही. तसेच त्यांनी अशाप्रकारचे तसेच प्रसारमाध्यमांना चर्चा करता येईल असे कोणतेही वक्तव्य भविष्यात करण्यापासून टाळावे.' पार्थ पवार यांचे हे ट्वीट देखील चांगलेच व्हायरल होत आहे. या पोस्टद्वारे पार्थ पवार यांनी अमोल मिटकरी यांना कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

Parth Pawar On Amol Mitkari: अमोल मिटकरींच्या भूमिकेशी पक्षाचा संबंध नाही, पार्थ पवार यांनी सुनावले खडेबोल
Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच; तिकडे NCP नेत्यांनी दिल्ली गाठली, पडद्यामागं काय घडतंय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com