CM Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: बालेकिल्ल्यातच मुख्यमंत्री शिंदेंना मोठा झटका; बड्या पदाधिकाऱ्याचा ठाकरे गटात प्रवेश निश्चित

Political News: काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता.

Ruchika Jadhav

फय्याज शेख

Shiv Sena News:

ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एक झटका बसलाय. शिंदे गटाचे सह्याद्री ठाकूर म. संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष जानू हिरवे हे आज उध्दव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश घेण्यासाठी जानू हिरवे शहापूरहून निघालेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जानू हिरवे यांच्या प्रवेशाने शहापूर विधानसभेचे सर्व पक्षाचे राजकीय गणित कोलमडणार आहे. शहापूर विधानसभा क्षेत्रात बहुतांश ठाकूर म.समाजाचे आदिवासी लोक राहतात. त्यांची संख्या 50% आहे. यामुळे शहापूर विधानसभेत उद्धव ठाकरे यांचं परडं जड होणार अशी स्थिती दिसतेय.

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता जानू हिरवे आज ठाकरे गटात प्रवेश करणारेत.

मराठा आरक्षणाला विलंब केल्याने बड्या नेत्याचा राजीनामा

आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अशातच मराठा समाजाला आरक्षण देण्यास विलंब केल्याने गुरूवारी शिंदे गटाच्या बड्या नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे बीडचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर तळेकर यांनी राजीनामा दिला आहे.

तळेकर यांच्यासोबत शिंदे गटाच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही देखील राजीनामा दिलेत. आरक्षण आमच्या हक्काचे अशी घोषणाबाजी देखील शिवसेना कार्यालयाबाहेर करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सचिन वाझेचा जामीन अर्ज फेटाळला

लाल की पांढरा तांदूळ, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता आहे उत्तम?

ऐन दिवाळीत 35 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; प्रशासनात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Diwali Firecracker Colours: लाल, हिरवा आणि निळा, फटाक्यांमध्ये हे रंग येतात कुठून?

Diwali 2026 : दिवाळीच्या फराळात वापरला जाणारा खवा शुद्ध की भेसळयुक्त? कसे ओळखाल

SCROLL FOR NEXT