Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: नंदुरबारमध्ये भाजपची ताकद वाढणार, हिना गावित यांची आज घरवापसी

Nandurbar Politics: नंदुरबार जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार आहे. माजी खासदार हिना गावित आज भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे.

Priya More

Summary -

  • माजी खासदार डॉ. हिना गावित यांची आज भाजपमध्ये घरवापसी

  • भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार

  • हिना गावित यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार

  • विधानसभा तिकीट न मिळाल्याने त्यांनी मागील निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवली होती

सागर निकवाडे, नंदुरबार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपची ताकद चांगलीच वाढत चालली आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसला यश मिळताना दिसत आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंक सुरू आहेत. अशातच नंदुरबारमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. कारण माजी खासदार हिना गावित आज घर वापसी करणार आहेत. हिना गावित भाजपमध्ये परत येणार असल्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होईल अशी चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार डॉ. हिना गावित यांची आज घरवापसी होणार आहे. हिना गावित यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा उपस्थितीत हिना गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. हिना गावित यांच्या घरवापसीमुळे नंदुरबारमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या हिना गावित यांनी अक्कलकुवा अक्राणी विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा पुन्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, हिना गावित या माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबारचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या भाजपमध्ये पुन्हा घर वापसीमुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजपला जिल्ह्यात मोठं करण्यामध्ये गावित कुटुंबीयांचे मोठं योगदान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात

Breaking : धक्कादायक! मुंबई, नागपूरसह ४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ

Five Hundred Rupees Note: ५०० रुपयांच्या नोटेवर किती भाषा असतात?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC झाली का? फक्त १२ दिवसांचा वेळ, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Accidents : पुण्यात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, जालना अन् बुलडाण्यात भयंकर दुर्घटना, राज्यात ७ जण ठार

SCROLL FOR NEXT