Nandurbar Politics : हिना गावित मुख्यमंत्र्यांची बदनामी करताय; आमदार आमश्या पाडवी यांचा आरोप

Nandurbar News : शिवसेना आमदार आमश्या पाडवी यांनी माजी मंत्री विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हीना गावित तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्यावर घणाघाती टीका केली आहे
Nandurbar Politics
Nandurbar PoliticsSaam tv
Published On

सागर निकवाडे
नंदूरबार
 : विधानसभा निवडणुकीत महायुती असताना माझ्या विरोधात हिना गावित यांनी बंडखोरी केली. हि बंडखोरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून केल्याचे हीना गावित सांगतात. मात्र त्या मुख्यमंत्र्याची बदनामी करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आमश्या पाडवी यांनी माजी खासदार हिना गावित यांच्यावर केला आहे. 

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. या कार्यक्रमाला सेना संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, अक्कलकुवा मतदार संघाचे आमदार अमाश्या पाडवी, कॉंग्रेसचे आमदार शिरीषकुमार नाईक, भाजपा आमदार राजेश पाडवी हे उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना सर्वपक्षीय आमदारांनी माजी मंत्री डॉ. गावित आणि परिवारावर टीका केली. 

Nandurbar Politics
Palghar Crime : रात्रीच्यावेळी वाहने अडवून लुटमार; गावात चोरी करताना अडकले सापळ्यात, चौघेजण पोलिसांच्या ताब्यात

गावित कुटुंबावर घणाघाती टीका 

सदरच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेना आमदार आमश्या पाडवी यांनी माजी मंत्री विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हीना गावित तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. यावेळी बोलताना आमदार पाडवी यांनी गावित कुटुंब हे कार्यकर्त्यांच्या वापर करून फेकून देतात. याचा अनुभव मी घेतला आहे. त्यांच्या निवडणुकीत मी प्रमाणिकपणे महायुतीचे काम केले. मात्र त्यांनी विधानसभेत माझ्याच विरोधात उमेदवारी केल्याचे म्हटले आहे. 

Nandurbar Politics
Bird Flu : बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला; रायगडमध्ये १ हजार कोंबड्यांची विल्हेवाट, लातुरात ५० कावळ्यांचा मृत्यू

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिढा?

नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक येऊ घातल्या आहेत. या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुतीमध्ये जिल्ह्यात सर्व काही आलबेल नसेल याचे संकेत पाडवी यांनी दिला आहे. सध्या जिल्हा परिषदेवर अध्यक्ष पद गावित परिवारात असून आगामी निवडणुकीत गावितांच्या विरोधात हि निवडणूक असणार कि वरिष्ठ नेते सर्व काही आलबेल करून टाकतील हा पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com