Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिवसेनेला मोठं खिंडार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का

Maharashtra Political News : सोलापूरमधील एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते शिवाजी सावंत यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यापाठोपाठ जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

Yash Shirke

  • सोलापूरमध्ये शिंदे सेनेला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

  • शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतर अनेक पदाधिकारी शिवसेनेतून बाहेर पडले आहेत.

  • पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने सोलापूरातील शिंदेगटाची ताकद कमी झाली आहे.

Maharashtra : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असताना राजकीय पक्षांमध्ये उलथापालथ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपापल्या सोयीनुसार नेते, पदाधिकारी पक्षबदल करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सोलापूरमधील नेते शिवाजी सावंत यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. आता पुन्हा सोलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे सोलापूरातील नेते शिवाजी सावंत यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सावंत शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सोलापुरातील शिंदे गटाच्या ११ पदाधिकाऱ्यांनी पक्षातून राजीनामे दिल्याचे समोर आले आहे. यामध्ये उपजिल्हाप्रमुख, जिल्हा समन्वयक अशा वेगवेगळ्या तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

'अधिकार नसलेले काहीजण हे पदाधिकारी निवड करत आहेत. शिवाजी सावंत यांच्या तालुक्यामधील निवड लोकसभा संपर्कप्रमुख असलेली व्यक्ती करत आहे. याबाबत आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितले होते, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. यामुळे आम्ही सामूहिकरित्या राजीनामे दिले आहेत', अशी माहिती सोलापूरमधील शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक दिलीप कोल्हे आणि हरिभाऊ चौगुले यांनी दिली आहे.

सोलापूरमध्ये शिवाजी सावंत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का बसल्याचे म्हटले जात होते. आता शिवाजी सावंत यांच्या पाठोपाठ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सोलापूरातील शिंदेसेनेची ताकद कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT