Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : वैयक्तिक कारण की नाराजीच? बैठकीत शिंदेंच्या अनुपस्थितीबाबत सामंतांचा मोठा खुलासा

Eknath Shinde : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर होते. यावरुन शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. या प्रकरणावर उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Yash Shirke

Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहप्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या संबंधित खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असूनही त्यांनी या बैठकीला दांडी मारली होती. या बैठकीला अजित पवारांची उपस्थिती होती. पण एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान उदय सामंत यांनी शिंदेंच्या गैरहजेरीचे कारण स्पष्ट केले.

उदय सामंत म्हणाले, 'एकनाथ शिंदे संवेदनशील आहेत. ते काही वैयक्तिक कारणांमुळे राहू शकले नाहीत. याचे विरोधकांनी राजकीय भांडवल करु नये. चर्चा सूत्रांच्या माध्यमातून होत आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक झाली. महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. शिवसेनेच्या इतिहासात त्यांच्या नेतृत्त्वात इतका मोठा विजय मिळाला.'

'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फार मोठ्या मनाचे आहेत. ते नाराज होऊ शकत नाही. शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. ते वैयक्तिक कारणांमुळे आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. तेव्हा याचे भांडवल करु नये' असे वक्तव्य करत उदय सामंत यांनी महायुतीत सगळं अलबेल असल्याचे संकेत दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यात राहायला का जात नाही? वर्षा बंगल्यावर काळी जादू झाली आहे का? असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. त्यावरही सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. 'सकाळी नऊ वाजताची मुलाखत घेणं बंद करा तर ती काळी जादू पण बंद होईल. ज्या वर्षा बंगल्याने मागच्या अडीच वर्षात लाखो लोक बघितले. जो वर्षा बंगला स्वत:साठी वापरला जायचा तो जनतेला बघता आला नाही, तो शिंदेच्या नेतृत्वात असताना जनतेला बघायला मिळाला. थोडं मेन्टेनन्सचं काम सुरु असेल, तर त्यावरुन राजकीय आरोप करण्याची गरज नाही', असे सामंत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT