devendra fadnavis uddhav thackeray saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : सत्तेत येण्याची देवेंद्र फडणवीसांची ऑफर, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Political News : अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची ऑफर दिली. या ऑफरवर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Yash Shirke

Maharashtra : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेचा विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या निमित्ताने त्याच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली. तुम्हाला आमच्यासोबत येण्याचा स्कोप आहे असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरेंनी थेट ऑफर दिली. या ऑफरवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर येण्याची ऑफर दिली. २०२९ पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाणं शक्य नाही पण तुम्हाला येण्याचा स्कोप आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांना ऑफरवरील त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी 'या गोष्टी खेळीमेळीने झाल्यात त्या तशाच घ्यायला पाहिजेत' असे म्हणाले.

उद्धवजी २०२९ पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर यायचा काही स्कोप नाही. पण तुम्हाला इथे यायचे असेल, तर बघा इथे स्कोप आहे. आपण याबाबत वेगळ्या पद्धतीने बोलू, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये केले होते. फडणवीस यांचे वक्तव्य खेळीमेळीने घ्यायला हवे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. याचदरम्यान राज्याचे पावसाळी अधिवेशन संपणार आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी आज (१६ जुलै) अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला. दानवे यांच्यानंतर विरोधी पक्षनेते पद कोणाकडे जाणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lightning Strike : शेतातून घरी जाताना आई- मुलावर काळाची झडप; वीज कोसळून जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

NAFED Onion Scam: नाफेड आणि NCCF च्या कांदा खरेदीत पुन्हा घोटाळा; साम टीव्हीच्या हाती अहवाल|VIDEO

लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, गर्लफ्रेंडवर चाकूने सपासप वार; नागपूर हादरले

Rakshabandhan 2025 : रक्षाबंधनानिमित्त लाडक्या भावासाठी बनवा स्पेशल 'सफरचंदाची जिलेबी', नात्यात राहील गोडवा

SCROLL FOR NEXT