Ajit Pawar |Devendra Fadanvis Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'मंत्रीपदाची ऑफर होती पण, राष्ट्रवादीनेच नाकारली..' अजित पवार गटाला का वगळलं? देवेंद्र फडणवीसांनी कारण सांगितलं

Maharashtra Politics Breaking News: नव्या केंद्रीय मंत्रीमंडळातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान केले आहे.

Gangappa Pujari

दिल्ली, ता. ९ जून २०२४

देशात नव्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा आज दिल्लीमध्ये पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रीमंडळात राज्यातील ६ खासदारांची वर्णी लागली आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाच्या दोन खासदारांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी लागली असतानाच अजित पवार गटाला वगळण्यात आले होते. यावरुनच राजकीय वर्तुळात उलट- सुलट चर्चा रंगल्या होत्या. याबाबत आता देवेंद्र फडणवीसांनी महत्वाचे विधान केले आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १ जादा देण्यात आली होती. प्रफुल्ल पटेल यांचे नाव फायनल केले होते. पण ते कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. त्यांना राज्यमंत्री करता येणार नाही असे त्यांचे मत होते. पण भविष्यात त्यांचा विचार होईल, आमच्याकडून राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ॲाफर दिली होती. पण राष्ट्रवादीकडून पुढील वेळेस दिलं तरी चालेल, " अस सांगण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

"तसेच "मोदी सरकारमधील सर्व मंत्र्यांचे मी अभिनंदन करतो. रक्षा खडसे, मुरली अण्णा मोहोळ यांच्या सारखे तरूण खासदार मंत्रीमंडळात आहेत. प्रतापराव जाधव सारखे ज्येष्ठ मंत्री असतील. त्यांचे अभिनंदन करतो," असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, केंद्रात मंत्रीपद न मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहही कारणीभूत असल्याची चर्चा आहे. लोकसभेतून निवडून येणाऱ्या खासदाराला म्हणजेच सुनिल तटकरे यांना मंत्रिपद मिळावं अशी काही कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इच्छा होती. तर प्रफुल पटेल हे केंद्र पातळीवरचे नेतृत्व असल्याने त्यांनीच मंत्री व्हावं अशी दुसऱ्या गटाची इच्छा होती. या दोन नेत्यांच्या वादात राष्ट्रवादीचं अडकलं असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्यांचा धुमाकूळ थांबवण्यासाठी सरकारची मोठी घोषणा: ‘नसबंदी’ला हिरवा कंदील

Delhi Bomb Blast: भारतातही हमासप्रमाणे हल्ल्याचा कट; उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक, NIAची मोठी कारवाई

Mithila Palkar: कपसाँग गर्ल मिथिला पालकरचा नवा ग्लॅमरस अवतार पाहिलात का?

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राज–उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! युतीची पायाभरणी?

आता पक्षासारखं हवेत उडा? पंख लावून माणसाला हवेत उडता येणार?

SCROLL FOR NEXT