Deputy CM Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, राजकीय वर्तुळात खळबळ

Eknath Shinde helicopter technical glitch: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. ते गुजरात दौऱ्यावर निघाले होते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

Priya More
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

  • एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

  • एकनाथ शिंदे गुजरात दौऱ्यावर आहेत

  • वडनगरहून अहमदाबादला रस्ते मार्गाने रवाना

गिरीष कांबळे, मुंबई

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरात दौऱ्यावर ते हेलिकॉप्टरने जाणार होते. पण टेकऑफ घेण्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्यामुळे एकनाथ शिंदे रस्ते मार्गाने अहमदाबादकडे रवाना झाले. वडनगर येथे एकनाथ शिंदेंनी हेलिपॅडवर ४५ मिनिटं हेलिकॉप्टरची वाट पाहिली. शेवटी ते रस्ते मार्गाने वडनगरवरून अहमदाबादकडे रवाना झाले. गुजरात दौऱ्यावरून ते परत येताना चार्टर्ड विमानाने येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुजरात दौऱ्यावर आहेत. बुधवारी रात्रीच ते मुंबईवरून गुजरातकडे रवाना झाले. आज वडनगर येथून ते हेलिकॉप्टरने अहमदाबादला जाणार होते. पण हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते वडनगरवरून कारने अहमदाबादला रवाना झाले. अहमदाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

अहमदाबाद येथील दौरा संपल्यानंतर एकनाथ शिंदे हे चार्टर्ड विमानाने मुंबईकडे येणार आहेत. ते याठिकाणावरून थेट सातारा येथील दरे गावात जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यातील जवळीक वाढत चालली आहे. ते पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात देखील अमित शाह यांच्यासोबत सहभागी होणार आहेत. अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे त्यांच्यासोबतच होते. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार आहेत. तर एकनाथ शिंदे हे राज्यातच राहणार आहेत. पण नंतर फडणवीसांनीच मी राज्यात राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'काव काव केल्याने कोणी कोयल होत नाही'; ठोंबरेंना सारंग यांचं प्रत्युत्तर, जागावाटपावरून राष्ट्रवादीत वाद चिघळला

काँग्रेस उद्या देशभरात 'काळा दिवस' पाळणार, इंडिया आघाडीचं दिल्लीत उद्या पुन्हा आंदोलन?

सकाळ करंडक : आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत तरुणाईचा नाट्याविष्कार, स्पर्धेचे वेळापत्रक वाचा

भाजपनं ८० च्या दशकातील अभिनेत्याला दिली महत्त्वाची जबाबदारी; सुपरस्टारला मिळाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा

वय वाढलं की राजकारणी वेड्यासारखं करतात; इंदुरीकर महाराजांच्या विधानानं वाद

SCROLL FOR NEXT