Jayant Patil On Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News: 'दिलेला शब्द पाळला पाहिजे...' अजित पवारांचा जयंत पाटलांवर निशाणा; नेमकं काय म्हणाले?

Gangappa Pujari

रुपाली बडवे, कर्जत| ता. १ डिसेंबर २०२३

Ajit Pawar News:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा निर्धार मेळावा कर्जतमध्ये सुरू आहे. या मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, आदिती तटकरे, मंत्री छगन भुजबळ यांनी या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्यामागचे कारण स्पष्ट करताना शरद पवारांवर नाव न घेता निशाणा साधला.

काय म्हणाले अजित पवार?

"मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे (Narendra Modi), ही आपली इच्छा आहे. माझ्यावर जे आरोप झाले जलसंपदा विभागाची त्यानंतर त्याचा विकास रेंगळाला. मी कामाला मान्यता देतो म्हणुन मला टार्गेट करण्यात आले. त्यावेळी नेमलेल्या समितीचा अहवाल आला आणि त्यांनी मला क्लीन चीट दिली," असे अजित पवार म्हणाले.

"काही जण आमच्यावर आरोप करतात की यांच्यावर केसेस होत्या म्हणून हे तिकडे गेले. मात्र ते निर्णय माझ्या एकट्याचे नव्हते, सर्व मंत्रीमंडळाची त्यास मंजुरी होती. आज माझ्याकडे अर्थखाते आहे. सहा लाख कोटींचे बजेट आहे. मात्र आजपर्यंत कोणताही आरोप नाही.." असे ते म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी बोलताना अजित पवार यांनी सत्तेत होण्यामागचे कारणही स्पष्ट केले. "काही वेळा निर्णय घ्यावे लागतात. आता भाजपा आणि सेनेसोबत आहोत. पण आपण फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारानेच चालतो. आपण सेक्युलर आहोत. मी मुस्लीम आणि अल्पसंख्याक लोकांना सांगतो. युतीच्या सरकारमध्ये आपण म्हणू होत नाही. एकट्याच सरकार असेल तर करता येते," असे ते म्हणाले.

जयंत पाटलांवर निशाणा..

"पक्ष सत्तेत आला तेव्हा प्रकाश सोळंखे नाराज होते. सरकारमध्ये घेत नाही म्हणून ते राजीनामा द्यायला निघाले होते. तेव्हा मी आणि जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढली. जयंत पाटील यांनी प्रकाश सोळंखे यांना तुम्ही कार्याध्यक्ष व्हा आणि नंतर प्रांत अध्यक्ष करु, असा शब्द दिला होता.मात्र जयंत पाटील यांनी शब्द देऊन एक वर्ष झालं तरी सोळंके यांना पद दिल नाही. आपण एखाद्याला शब्द दिला की तो पाळला गेला पाहिजे ना?" असेही अजित पवार यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

SCROLL FOR NEXT