Ajit Pawar Speech in NCP Melava In Karjat : बारामतीत लढणार; अजित पवारांनीच केलं जाहीर, लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना थेट आव्हान

Ajit Pawar Vs Supriya Sule : कर्जतमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या विचारमंथन मेळाव्यात पवार बोलत होते. अजित पवार यांनी बारामती, मावळ, रायगड, सातारा या लोकसभेच्या जागा लढवण्याची घोषणा केली आहे.
Supriya Sule and ajit pawar
Supriya Sule and ajit pawar Saam Tv
Published On

Ajit Pawar News :

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. अजित पवार गट बारामती लोकसभेची जागा लढणार असल्याचं खुद्द अजित पवार यांनी जाहीर केलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट सुप्रिया सुळेंसमोर कडवं आव्हान उभं करणार हे स्पष्ट झालं आहे. कर्जतमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या विचारमंथन शिबिरात अजित पवार बोलत होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवार यांनी शिबिरात नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारील लागण्याच्या देखील सूचना केल्या आहेत. यावेळी अजित पवार यांनी बारामती, मावळ, रायगड, सातारा या लोकसभेच्या जागा लढवण्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार गट निवडणूक लढवणार का? अशी चर्चा होती. या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे.

Supriya Sule and ajit pawar
Ajit Pawar News: 'दिलेला शब्द पाळला पाहिजे...' अजित पवारांचा जयंत पाटलांवर निशाणा; नेमकं काय म्हणाले?

नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून निवडून आणण्यासाठी आपल्याला ताकदीने काम करायचे आहे. महाराष्ट्रातून महायुतीचे जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं.  (Latest Marathi News)

बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या चार जागा तर आपण लढवणारच आहोत. याशिवाय ठाकरे गटाच्याही काही जागा लढवणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळ जाहीर केलं.

Supriya Sule and ajit pawar
Datta Dalvi Bail: दत्ता दळवींना अखेर जामीन मंजूर; कोर्टानं घातल्या ५ महत्वाच्या अटी

जयंत पाटलांवरही निशाणा

"पक्ष सत्तेत आला तेव्हा प्रकाश सोळंखे नाराज होते. सरकारमध्ये घेत नाही म्हणून ते राजीनामा द्यायला निघाले होते. तेव्हा मी आणि जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढली. जयंत पाटील यांनी प्रकाश सोळंखे यांना तुम्ही कार्याध्यक्ष व्हा आणि नंतर प्रांत अध्यक्ष करु, असा शब्द दिला होता. मात्र जयंत पाटील यांनी शब्द देऊन एक वर्ष झालं तरी सोळंके यांना पद दिल नाही. आपण एखाद्याला शब्द दिला की तो पाळला गेला पाहिजे ना? असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com