Maharashtra Politics: Vijay Wadettiwar Devendra Fadanvis Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'निकालासंदर्भात खोटे पसरवण्याचे काम, हिंमत असेल तर निवडणुका लावा...' कॉंग्रेसचे भाजपला थेट आव्हान

Vijay Wadettiwar Latest News: संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, प्रतिनिधी

Vijay Wadettiwar News:

राज्यात नुकताच ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडला. राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये झालेल्या या लढतीत अनेक दिग्गजांना धक्का बसल्याचे पाहायला मिळाले.

ग्रामपंचायत निकालानंतर सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा भाजपने केला आहे. मात्र हा दावा खोडून काढत भाजप निकाला संदर्भात खोटे पसरवत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"भाजपने ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात काल माध्यमांमध्ये खोटं पसरवण्याचे काम केले. आम्ही सगळी माहिती घेतली, महाविकास आघाडीपुढे आहे. पण त्यांनी असा काय डंका वाजवला की जणू ते पुढे आहेत.. अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच आमचे आव्हान आहे त्यांना की त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावा, बघू जनता कोणाच्या बाजूने आहे," असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा...

यावेळी पुढे बोलताना विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. "मराठवाड्यात पाण्याचा तुडवडा आहे, फक्त 38 टक्के पाणीसाठा आहे. औरंगाबादमध्येही 86 टक्के पाणीसाठा होता. सत्तेतील मंत्री आमदारांचे लाड पुरवले जाताहेत मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं," अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. तसेच संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

2020 मध्ये MPSC परीक्षा पास झाले, मात्र त्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. पाटबंधारे आणि pwd मध्ये तात्काळ भरारी करावी अशी मागणी मी केली आहे. मात्र अद्याप नियुक्ती करण्यात आली असून मुले आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आहेत.. अशी चिंता वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT