Sanjay Raut: याला काय म्हणावं? हास्य जत्राच!; सर्वाधिक जागा जिंकल्याच्या भाजपच्या दाव्यावरून संजय राऊतांचा टोला

Maharashtra Political News: महायुती आणि महाविकास आघाडी आमनेसामने असताना महायुतीने विजयाचा झेंडा रोवल्याचा दावा केला जातोय.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSaam TV
Published On

Sanjay Raut News:

राज्यात काल ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा धुरळा पार पडला. महायुती आणि महाविकास आघाडी आमनेसामने असताना भाजपने विजयाचा झेंडा रोवत नंबर एकवर दावा केला. मात्र हा दावा खोटा असल्याचं सांगत खासदार संजय राऊतांनी ट्वीटरवरून सरकारची खिल्ली उडवलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Raut News
Nandurbar Crime News : केळीच्या बागेत लावला गांजा; १७ लाख ७४ हजार रुपये किमतीचा २ क्विंटल ५३ किलो गांजा जप्त

राज्य अडानी लोकांच्या हाती गेलंय

एका बातमीचा फोटो राऊतांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट केलाय. हा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलंय की, "काळ मोठा कठीण आला आहे. राज्य अडानी लोकांच्या हाती गेले आहे. निवडणुका आम्हीच जिंकल्याचा दावा बरेच गटतट करत आहेत."

आम्हीच जिंकलो हा दावा पोकळ आहे

"या निवडणुका पॅनल पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हीच जिंकलो हा दावा पोकळ आहे. हे लोक विद्यापीठाच्या सेनेट निवडणुका घेण्यास घाबरतात.", असं संजय राऊत म्हणाले.

हास्य जत्राच!

पुढे सरकारची खिल्ली उडवत संजय राऊतांनी म्हटलं की, "मुंबई सह १४ महानगर पालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते. ते ग्रामपंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा गुलाल उधळत आहेत. याला काय म्हणावं? हास्य जत्राच!"

विजयाचा खोटा दावा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपच्या नंबर एकवरील दाव्यावर म्हटलं की, "राज्यातील बहुतांश बाजार समित्यांवर काँग्रेस व मित्रपक्षांचाच विजय झालेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही राज्यातील जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे मात्र ‘खोटे बोल पण रेटून बोल’ अशा पद्धतीने ते विजयाचा खोटा दावा करत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे."

Sanjay Raut News
Amravati Crime: घरगुती वादातुन पत्नीवर जीवघेणा हल्ला; घटनेनंतर पती स्वतः गेला पोलिसात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com