Ajit pawar Eknath shinde PTI
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही फक्त एक व्यवस्था; भाजप नेते प्रवीण दरेकर असे का म्हणाले?

Maharashtra Political News : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली होती. वक्तव्याची चर्चा झाल्यानंतर त्यांनी युटर्न घेत नवीन विधान केले. पटोलेंच्या दोन्ही विधानांवर प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Yash Shirke

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. तुम्ही काँग्रेसमध्ये या तुम्हाला मुख्यमंत्री बनवू असे पटोले म्हणाले होते. या वक्तव्यावर चर्चा व्हायला सुरुवात झाल्यानंतर नाना पटोले यांनी युटर्न घेतल्याचे पाहायला मिळते. नाना पटोलेंनी ऑफरबद्दल स्पष्टीकरण दिले.

'काल धुलीवंदनाचा दिवस होता. त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटलं होतं बुरा न मानो होली है! मी गमतीनं त्या विषयाला घेतलं. काही लोक त्याला सिरीयस घेत असतील तर त्यांनी सिरीयस राहावं. काल थट्टेचा दवस होता, थट्टा आता संपली' असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या ऑफरच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न नाना पटोले यांनी दिला.

नाना पटोलेंच्या स्पष्टीकरणावरही चर्चा होत आहे. त्यांच्या दोन्ही वक्तव्यांवरुन भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'स्वतःच्या मतदार संघात भवितव्य टिकवता येत नाही ते मुख्यमंत्री बनवायला निघालेत. आपल्या हातात काय नाही आणि दुसऱ्याला द्यायला निघालेत', असे म्हणत दरेकरांना नाना पटोलेंना जोरदार टोला लगावला आहे.

'आम्हाला कोणाची गरज नाही. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन प्रचंड मॅडेट सरकार चालल आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा सपाट असा आहे की, आता आपलं भवितव्य काय अशी चिंता त्यांना सतावत आहे. त्याच हतबलतेतून आलेले हे वक्तव्य आहे. आमचं प्रचंड बहुमत आहे. तिघेही गुण्यागोविंदाने सरकार चालवत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही एक व्यवस्था आहे. कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री यापेक्षा राज्यातील जनतेला काय पाहिजे हे महत्त्वाचे आहे,' असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial Update : तुमच्या आवडत्या मालिका नवीन वेळेत, आताच वेळापत्रक नोट करा

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Weight Loss Facts: उपाशी राहिल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

Horoscope Saturday Update : शत्रु त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा; आजचे राशीभविष्य

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT