Akash Gavit joins BJP in Navapur  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

Akash Gavit joins BJP in Navapur: नंदुरबारच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला. शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं.

Priya More
  • नंदुरबारमध्ये मोठी राजकीय घडामोड

  • नवापूरमध्ये काँग्रेसचे नेते आकाश गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश

  • आकाश गावित यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह हाती घेतला भाजपचा झेंडा

  • शिरीष नाईक यांच्या निकटवर्तीयाचा भाजपमध्ये प्रवेश

सागर निकवाडे, नंदुरबार

भाजपकडून जोरदार ऑपरेशन लोटस सुरू आहे. भाजप महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकापाठोपाठ एक धक्के देत आहे. भाजपने आता काँग्रेसला मोठा धक्का दिला. नंदुरबारच्या नवापूरमध्ये भाजपने मोठी खेळी करत काँग्रेस आमदार शिरीष नाईक यांच्या निकटवर्तीयाला फोडले. काँग्रेसचे स्थानिक नेते आकाश गावित यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत अनेक सहकाऱ्यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं. यामुळे राजकीय वर्तुळात खळबल उडाली.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला. काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांचे निकटवर्ती मानले जाणारे आकाश गावित यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. ​भाजपचे आमदार राजेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या घडामोडीमुळे नवापूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.

माजी खासदार कै. माणिकराव गावित यांचे नातू आणि नवापूर विधानसभेचे काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यांचे निकटवर्तीय आकाश गावित यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहल्याला जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी देखील उपस्थिती लावली. या पक्षप्रवेशामुळे नंदुरबारमध्ये भाजपची ताकद वाढली. आगामी स्थानिक राजकीय समीकरणांवर याचा नेमका काय परिणाम होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसच्या आंदोलनात नेहा बोरा फ्रंटफूटवर, पोलिसांना भिडणारी नेहा बोरा नेमकी कोण?

सोमेश्वरवर 'पवारांचीच' सत्ता; सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचा 21 जागांवर दणदणीत विजय

दुष्काळग्रस्तांना 'मायक्रो फायनान्स'चा विळखा, कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या बायकांचे काढले फोटो

Yuvraj Singh : क्रिकेटच्या मैदानात एकाच वेळी 'दादा'गिरी आणि 'दरारा'; सिक्सर किंग युवराज सिंगवर मोठी जबाबदारी

2029 मध्येही काँग्रेसचा चौथ्यांदा पराभव होणार; अमित शाहांचं राहुल गांधींना आव्हान

SCROLL FOR NEXT