Political circles abuzz in Maharashtra following a senior leader’s claim of an imminent Chief Ministerial change. saam tv
महाराष्ट्र

येत्या २ महिन्यात राज्याचा CM बदलणार? महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

Maharashtra CM : महायुतीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एका वरिष्ठ नेत्याने मुख्यमंत्री दोन महिन्यांत बदलू शकतील असा दावा करण्यात आलाय. प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अटकळांना वेग आलाय.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची शक्यता वर्तवली जातेय.

  • एका बड्या नेत्याच्या विधानामुळे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आलंय.

  • महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि राजकीय हालचाली चर्चेला पेव फुटले आहे.

गेल्या काही वर्षांपासून राज्याचे राजकारण अस्थिर झालंय. आता पुन्हा राज्याचे राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याच्या चर्चांनी धरला. सरकारमध्ये मोठ्या उलाथपालथ होणार असून महाराष्ट्राचा सीएम पुन्हा बदलणार असल्याचा दावा एका पक्षाचे बड्या नेत्याने केलाय. दोन्ही राष्ट्रवादीची जवळीकता, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची झाली भेट, नंतर शिंदेंचा दिल्ली दौरा आणि महायुतीमधील वादविवादाचे चित्र पाहिलं तर मुख्यमंत्री बदलाच्या दाव्याला महत्त्व प्राप्त होतंय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत सगळे काही आलबेल नसल्याचे दावे केले जात होते. अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात लढले. भाजपा आणि शिवेसना शिंदे गटाचे नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. यानंतर महापालिका निवडणुका भाजप आणि शिंदे गटाने महापालिका निवडणूक एकत्र लढण्याबाबत चर्चा केली. त्याच दरम्यान येत्या दोन महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, असा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतःची पॉवर काय हे दाखवून दिलंय. आगामी राज्यातील महापालिकेत भाजप स्वतंत्र लढणार असल्याचं म्हणत होती, पण आता त्यांनी माघार घेत युती करून लढू असे ते म्हटलंय. एकनाथ शिंदे हे अमित शाह यांना भेटले, त्यानंतर हा भाजपने युटर्न घेतला. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना खिशात घातलंय. ही त्यांची किमया आहे. त्यामुळे आता सर्व महापालिकांच्या निवडणुका शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र लढणार आहेत.

विधानसभेची निवडणूक झाली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले नाही, त्याचा हा बदला असावा असं त्यावरून दिसतंय, असे प्रकाश आंबेडकर म्हणालेत. दरम्यान एकनाथ शिंदे येत्या महिना दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील असे वाटतंय, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

शरद पवार चाणक्य आहेत. काही काळापूर्वी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. त्यातून त्यांनी एकनाथ शिंदे यांनी योग्य संदेश दिला. एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासारख्या माणसाला खिशात घातलंय. तसेच खेळ आता सुरू झालाय. NDA मध्ये अजून काही होणार का हे पाहू आणि मग कुठे जायचे ते ठरवू,असे सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. युती करूनच महापालिका निवडणुका आम्ही लढणार आहोत. नगरपालिका निवडणुकीत आम्ही युती करून लढलो आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आम्ही युती करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT