Raigad Politics Saam Tv
महाराष्ट्र

शिवसेना आमदाराच्या पत्नीसमोर चित्रलेखा पाटील म्हणाल्या ५० खोके...; सुरूवातीला बाचाबाची नंतर धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

Raigad Politics: रायगडमध्ये दोन महिल्या नेत्या आमने-सामने आल्या. शिवसेना आमदाराच्या पत्नीसमोर चित्रलेखा पाटील यांनी ५० खोक्याचा उल्लेख केला. त्यामुळे वाद झाला आणि या दोन्ही महिला नेत्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली.

Priya More

रायगड जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुरुड येथे दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनास्थळावर शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराची पत्नी आणि शेकापच्या महिला नेत्याने भेट दिली. यावेळी या दोन्ही महिला नेत्या आमने-सामने आल्या. सुरूवातीला वाद त्यानंतर धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे दरड कोसळून विठा गायकर या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या घटनास्थळाला भेट देण्यासाठी शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील आणि आमदार महेंद्र दळवी यांची पत्नी मानसी दळवी आल्या होत्या. यावेळी या दोन्ही महिला नेत्यांमध्ये वाद झाला. दुर्घटनास्थळी बोलत असताना चित्रलेखा पाटील यांनी ५० खोके असा उल्लेख केला. यावेळी संतप्त झालेल्या आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी चित्रलेखा यांना अडवले. सुरूवातीला शाब्दिक बाचाबाची नंतर त्यांच्यामध्ये काही प्रमाणात धक्काबुक्की झाली. या घटनेनंतर घटनास्थळावर तणावाचे वातावरण होते.

शेकापचे नेते आणि माजी आमदार जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्या समोर ५० खोकेचे विधान केले. 'या घटने जो दोषी आहे त्याच्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे. किती दिवस हा चिखलाचा रस्ता आम्ही सहन करणार. आमच्या जीवनाची काही किंमत आहे की नाही. हे ५० खोके कोण काय? घाणेरडं चाललं आहे हे राजकारण आणि समाजकारण.', असे म्हणत चित्रलेखा पाटील यांनी स्थानिक आमदारावरच निशाणा साधला. यावेळी आमदाराच्या पत्नी चांगल्याच संतापल्या. त्यांनी थेट चित्रलेखा यांना अडवत पाठीमागून धक्का दिला आणि जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही महिला नेत्यांमध्ये हमरीतुमरी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ban Online Betting Games: मोदी सरकारचा आणखी एक स्ट्राईक; ऑनलाइन बेटिंग गेम्सवर आणणार बंदी

Crime: दारूच्या नशेत बायकोवर कुऱ्हाडीने वार, नंतर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; जळगाव हादरले

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे धुमशान! रेल्वेसेवेला मोठा फटका, २०-२१ ऑगस्टला लांबपल्ल्याच्या ट्रेन्स रद्द; वाचा लिस्ट

Maharashtra Rain Live News: मुंबईसाठी उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळां-महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत अद्याप निर्णय नाही: BMC

Mumbai Monorail: मुंबईची मोनोरेल का बंद पडली? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT