Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एमआयएमपक्षातून गफ्फार कादरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमला धक्का बसला आहे.

Yash Shirke

माधव सावरगावे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : उपमुख्यमंत्री अजित पवार हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. आज (१४ ऑगस्ट) अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा कार्यक्रम पार पडला. एमआयएम म्हणजेच ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातून गफ्फार कादरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. यामुळे एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे.

अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये गफ्फार कादरी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला. प्रवेशाच्या वेळी कादरी यांनी असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले. 'असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील हे वक्फ बोर्डाच्या नावावर खोटे बोलतात. त्यांच्या नावावर अनेक जमिनी आहेत. इम्तियाज जलील यांचे वक्फ बोर्डाच्या जागेवर ऑफिस आहे, असे वक्तव्य गफ्फार कादरी यांनी केले.

असदुद्दीन ओवैसी हे मुस्लिमांची फसवणूक करत आहेत. ओवैसी यांनी माझ्यावर गद्दार असा आरोप केला होता, त्यावरुन मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ते लोकांना अल्लाह, रसूलच्या नावावर खोटे बोलतात. एकदा तर रक्ताची गरज आहे म्हणून मी दहा बाटल्या रक्त दिल्याची फेकमफाकी केली होती, असे गफ्फार कादरी म्हणाले.

गफ्फार कादरी यांच्या पक्षप्रवेशादरम्यान अजित पवार यांनी भाषण केले. भाषणाची सुरुवात त्यांनी हिंदीतून केली. हम सब हिंदुस्तानी है बस इतनीही हमारी पहचान है असे अजित पवार म्हणाले. 'पक्षाची रचना अशीच आहे, जी यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा आहे. महाराष्ट्रातील सर्वांना सोबत घेऊन जात आहोत. सर्वधर्म समोर ठेवून पुढे जातोय. यशवंतराव चव्हाणांचा वारसा पुढे घेऊन आम्ही जातोय, असे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

Mumbai Bomb Threat: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला धमकीचा कॉल; रेल्वेगाडी बॉम्बने उडवून टाकू!

Independence Day : स्वातंत्र्य दिनाला फ्री पिझ्झा? दर तासाला 75 पिझ्झा फ्री मिळणार?

President Droupadi Murmu: संविधान, लोकशाही....ऑपरेशन सिंदूर ते पहलगाम हल्ला; राष्ट्रपतींच्या संबोधनातील ठळक मुद्दे

Ladki Bahin Yojana : लाखो घरांमध्ये तीन लाडक्यांना लाभ, संभाजीनगरात तब्बल 84 हजार अर्ज; हजारो लाडकींचे अर्ज रडारवर

SCROLL FOR NEXT