Chhagan Bhujbal Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित पवारांकडून कृषी मंत्रिपदाची पहिली ऑफर मलाच, छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांकडून कृषी मंत्रालयाची पहिली ऑफर मलाच देण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्याची आता चर्चा होऊ लागली आहे.

Priya More

Summary -

  • अजित पवारांनी कृषी मंत्रिपदाची पहिली ऑफर मला दिल्याचे छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये सांगितले.

  • भुजबळ यांनी ग्रामीण भागातील नेत्याला खाते दिले जावे असे म्हणत ही ऑफर नाकारली होती.

  • रम्मी गेम वादानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेतले.

  • दत्ता भरणे यांच्याकडे आता कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

पावसाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन रमी गेम खेळतानाचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. यानंतर त्यांच्याकडून कृषीखाते काढून घेण्यात आले आहे. त्यांच्यावर आता क्रीडा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्याचे कृषीमंत्रिपद दत्तात्रय भरणे यांच्यावर सोपवण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'कृषिमंत्रिपदाची पहिली ऑफर मलाच दिली होती.', असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी कृषी मंत्रिपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी सांगितले की, 'कृषीमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजितदादांनी मला दिली होती. भाजप आणि शिंदेंसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित दादांनी अर्थ खाते स्वतःकडे ठेवल्यानंतर सर्वात आधी कृषी खात्याची ऑफर मला दिली होती. कृषी मंत्री ग्रामीण भागातील असला तर जास्त न्याय देऊ शकतो अशी माझी भूमिका होती. कुठलेही खाते लहान मोठे नसते, आपण काय काम करतो यावर अवलंबून असतं.'

माणिकराव कोकाटे यांना क्रीडा खातं दिल्याबाबत छगन भुजबळ यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर निर्णय घेतात. मी अधिक बोलणं योग्य राहणार नाही. याआधी देखील अनेक कृषिमंत्री राहिले आहेत. देशाचे कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांनी देखील काम केले आहे. त्यामुळे कुठल्या खात्यात काही अडचण राहत नाही. विरोधकांचं काम आहे त्यामुळे ते राजीनामा मागतात.'

दादा भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, 'दत्ता मामा भरणे देखील ग्रामीण भागातून आलेले आहेत. या खात्याला न्याय देऊ शकतील. ज्यावेळी आम्ही भाजप- शिंदे गटासोबत सरकारमध्ये आलो त्यावेळी अजित पवारांनी अर्थ खाते घेतले. त्यावेळी माझ्या पुढे सर्व खाते ठेवले. मला कृषी खाते घेण्यासाठी आग्रह केला. मोठे खाते घेण्यासाठी खूप आग्रह केला गेला. पण ग्रामीण भागातील लोकांना द्या हे मी सांगितले. माझे राजकारण मुंबई झाले आहे. आम्ही शेतकरी प्रश्नावर मागे उभे राहतो पण त्याची बारीक सारीक माहिती देणारे माणसे ग्रामीण भागात असतात. त्यामुळे भरणे मामा न्याय देतील. बालपणापासून जो ग्रामीण भागात राहिलेला आहे तो जास्त न्याय देऊ शकतो. भरणे मामा यांना अडचण येईल असं वाटत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

Horoscope: करिअरमध्ये प्रगती साधाल; यश, उन्नतीचे नवीन मार्ग मिळतील

Top 7 Mileage Bikes 2026: भारतात या टू व्हिलर देतात सर्वाधिक मायलेज; लिस्टमध्ये अनेक बाईक्सचा समावेश

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

SCROLL FOR NEXT