निधी वाटप आणि खात्याच्या अधिकारांवरुन महायुतीत अंतर्गत धुसफूस आहे.. त्यातच आता अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमात शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आलाय... शिंदे सेनेचे मंत्री आणि आमदारांनी अजित पवारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाकडे पाठ फिरवलीय. याला मंत्रिमंडळ बैठकीतील वादाची किनार असल्याची चर्चा रंगलीय...
कोकाटेंच्या राजीनाम्याआधी शिंदेसेनेच्या मंत्र्यांचाही राजीनामा घ्या
शिंदेंच्या मंत्र्यांमुळेही सरकार अडचणीत
मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या मंत्र्यांचा सूर
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीचे मंत्री आणि आमदारांना वांद्र्यातील ताज अँड लँड्स हॉटेलमध्ये जेवणाचं निमंत्रण दिलं होतं.. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली.. मात्र शिंदे सेनेचे मंत्री आणि आमदारांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलंय... त्यावरुन विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय..
खरंतर महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कुरघोडीचं राजकारण रंगल्याची चर्चा आहे... तर अनेकदा शिंदे सेनेने अजित पवारांच्या खात्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केलीय...
सामाजिक न्यायचा निधी लाडकीसाठी वळवल्याने शिरसाटांची दादांवर नाराजी
रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन गोगावले विरुद्ध तटकरेंमध्ये रस्सीखेच
विकासकामांसाठी निधी देत नसल्याचा शिंदे सेनेच्या आमदारांचा आऱोप
मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आधीच महायुतीची कोंडी झालीय.. त्यात आता अंतर्गत धुसफूस वाढल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे... त्यामुळे आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांचं मनोमिलन घडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना यश मिळणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.