Shreya Maskar
मनसर तलाव हे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील मनसर शहरात आहे. नागपूर-जबलपूर महामार्गालगत नागपूरच्या अंदाजे ४५ किमी ईशान्येला वसलेले आहे.
मनसर हे वाकाटक साम्राज्य काळातील एक अतिशय महत्त्वाचे ऐतिहासिक आणि पुरातत्वीय स्थळ आहे. सातवाहन काळानंतर इ.स.च्या तिसऱ्या शतकात येथे वाकाटक राजांचे राज्य होते. मनसर हे त्या काळातील एक प्रमुख शहर होते.
१९९२ ते २००४ दरम्यान झालेल्या उत्खननात येथे विटांनी बांधलेली प्राचीन मंदिरे आणि बौद्ध वास्तूंचे अवशेष सापडले आहेत, असे बोले जाते.
नागपूर जवळील मनसर ज्याला 'प्रवरपूर' म्हणूनही ओळखले जात असे. हे वाकाटक राजघराण्यातील राजा प्रवरसेन दुसरा याची राजधानी होती.
निसर्गरम्य दृश्यांनी नटलेले हे एक सुंदर आणि शांत जलाशय आहे, जे निवांत वन डे ट्रिप करण्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही येथे फोटोशूटचा आनंद देखील घेऊ शकता.
मनसरजवळ सुवी बर्ड पार्क आहे. येथे वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात. १,५०० हून अधिक पक्षी आणि १०० हून अधिक दुर्मिळ व विदेशी प्रजाती पाहायला मिळतात.
खिंडसी तलाव हे रामटेक मंदिराजवळ वसलेले आहेत. तुम्ही येथे बोटिंचा आनंद घेऊ शकता. लहान मुलांना येथे तुफान मजा-मस्ती करता येईल.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.