BJP Leader Chandrashekhar Bawankule Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'सर्वांवर आमची करडी नजर, बंडखोरी केली तर...', चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम

BJP Leader Chandrashekhar Bawankule: भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडाऱ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात खळबळजनक विधान केले. 'सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले आहेत.', असे ते म्हणाले.

Priya More

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खळबळजनक विधान केले. यावेळी त्यांनी 'सर्वांवर आमची करडी नजर, बंडखोरी केली तर नेत्यांचे दरवाजे ५ वर्षांसाठी बंद होईल', असा सज्जड दम त्यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना दिला. तसंच, 'सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले आहेत.', असे देखील त्यांनी सांगितले.

'आता भंडाऱ्यातील सर्व मोबाईल आणि व्हाट्सअप ग्रुप सर्विलेन्सवर टाकले असून सर्वांवर बारीक करडी नजर राहणार आहे. पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना नेत्यांचे दरवाजे पाच वर्षासाठी बंद होईल.', असं खळबळजनक वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. भंडारा भाजपच्या वतीने दिवाळी स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे धक्कादायक विधान केले.

यावेळी बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना असे देखील सांगितले की, 'आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पक्षात कुणी बंडखोरी केल्यास त्याचा फटका पक्षाला बसतो. एक चुकीचं बटन दाबल्यास देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ होईल. त्यामुळं चुकीचं बटन दाबून भंडाऱ्याचा सत्यानास करू नका.'

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. काही ठिकाणी काही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. पण याबाबत अद्याप काहीच घोषणा करण्यात आली नाही. या निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone : चाहत्याच्या आईने पुरणपोळी आणली अन् दीपिकाने थेट...; VIDEO मधील साधेपणा पाहून नेटकरी भारावले

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Nashik Politics: मोठी बातमी! नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंनी ३ बडे नेते फोडले

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपये पगार; पात्रता काय? वाचा सविस्तर

Gold Rate Today: सोन्याची किंमतीत वाढ की घसरण? वाचा २२ आणि २४ कॅरेटचा आजचा दर

SCROLL FOR NEXT