Shahada : दीड महिन्यापासून पगार थकित; शहादा नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कामबंद

Nandurbar Shahada News : एस. आर. ग्रीनवे एंपियर नाशिक संस्थेकडे स्वच्छता विभागाचे टेंडर गेल्यापासून कर्मचाऱ्यांना वारंवार पगारात विलंब होत आहे. कर्मचाऱ्यांना उशिराने पगार दिला जात आहे
Nandurbar Shahada News
Nandurbar Shahada NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: मागील दीड महिन्यांपासून वेतन थकले असून दिवाळीसारख्या सणाच्या उत्सवात देखील पगार न झाल्याने शहादा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ऐन दिवाळीत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने शहरात अस्वच्छता पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा नगरपालिकेत स्वच्छता विभागात काम करत असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यांपासून टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या नंतरही कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सुटलेला नाही. एस. आर. ग्रीनवे एंपियर नाशिक या संस्थेकडे स्वच्छता विभागाचे टेंडर गेल्यापासून कर्मचाऱ्यांना वारंवार पगारात विलंब होत आहे. कर्मचाऱ्यांना उशिराने पगार दिला जात आहे. 

Nandurbar Shahada News
Miraj News : भर रस्त्यावर रस्त्यावर खिळे टोचून टाकला लिंबू; अंधश्रध्येतुन प्रकार, नागरिकांमध्ये भीती

दीड महिन्यांपासून पगार थकला 

आता देखील मागील दीड महिन्यापासून एकाही कर्मचाऱ्याला पगार मिळालेला नाही. त्यामुळे दीपावलीच्या तोंडावरच त्यांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. दिवाळीचा बाजार देखील पगार नसल्याने होऊ शकलेला नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे आजपासून शहरातील सर्व स्वच्छता कामकाज ठप्प झाले असून अनेक भागांत कचरा साचू लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

Nandurbar Shahada News
PCMC News : ऐन दिवाळीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई; कर थकवणाऱ्या २७ मालमत्ता केल्या जप्त


तोडगा काढण्याची मागणी 

आंदोलनामुळे नगरपालिका प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला आहे. नागरिकांनी प्रशासन आणि ठेकेदार संस्थेने तात्काळ हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा शहरात अस्वच्छतेची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. अर्थात ऐन दिवाळीत शहरात स्वच्छता पसरण्याची शक्यता आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com