Navneet Rana Saam TV
महाराष्ट्र

Navneet Rana: ब्रेकिंग! नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध.. सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; लोकसभेचा मार्ग मोकळा

Pramod Subhash Jagtap

Navneet Rana Cast Certificate Case:

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल अखेर समोर आला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर निकाल देताना नवनीत राणा यांना दिलासा देत हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आहे.

नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जात आहे. अशातच त्यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.

नवनीत राणांना सर्वोच्च दिलासा..

नवनीत राणा (Navneet Rana) यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने 2021 मधे अवैध ठरवलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोन्ही गटाचा युक्तिवाद २८ फेब्रुवारीला पूर्ण झाला होता. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने आजच्या निकालामध्ये नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. न्यायमूर्ती जे के महेश्वरी आणि संजय करोल यांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकसभेचा अर्ज भरला..

दरम्यान, आज अमरावतीमध्ये नवनीत राणा या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून अमरावतीत भाजपचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज अमरावतीमधील भाजपच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

SCROLL FOR NEXT