मसुरकर सूरज साम टीव्ही, मुंबई
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये (Mahayuti) अजूनही ११ जागांचा तिढा कायम आहे. भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट या महायुतीला अद्याप ११ लोकसभा जागांचा उमेदवार निश्चित करता आलेला (Mahayuti Seat Sharing Lok Sabha)नाही. त्यामुळे या जागांवरून स्थानिक पातळीवरील अस्वस्थता कायम आहे. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. (latest politics news)
उत्तर-मध्य मुंबई लोकसभेच्या जागेवर पूनम महाजन की आशिष शेलार किंवा दुसरा उमेदवार, याबाबत निर्णय भाजपला करता आलेला नाही. त्यामुळे या जागेचा तिढा कायम आहे. उत्तर-पश्चिम मुंबईची जागा भाजपकडे जाणार की शिंदे सेनेकडे हा प्रश्न देखील कायम आहे. तसंच दक्षिण मुंबईची जागा भाजपने लढायची की, शिंदेसेनेला द्यायची हेही ठरता ठरत (Mahayuti Seat Sharing) नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिंदेसेनेचा या जागेवर हक्क असल्याचं स्पष्ट केलंय. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत तेच उमेदवार असतील असे संकेत दिले (Maharashtra Lok Sabha Election 2024) आहेत. त्यामुळे याही जागेबाबत संभ्रम कायम आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीसाठी सर्वांत मोठा डोकेदुखीचा विषय बनला आहे. या जागेसाठी भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट दावा करत आहेत. या जागेसाठी तिघंही आग्रही (Maharashtra Politics) असल्यामुळे आणि तिघांच्याही दावेदारीने वाढलेलं टेन्शन कायम आहे. ठाणे जागेसाठी भाजप अडला आहे, तर या जागेवर शिंदे सेना दावा करत आहे.
कल्याण मतदारसंघाची उमेदवारी श्रीकांत शिंदेंना देण्यात अडचणी येत (Politics News) आहेत.पालघरच्या शिंदेसेनेच्या जागेवर भाजपने दावा सांगितला आहे. त्यामुळे याही जागेचा तिढा काही सुटलेला दिसत नाही. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून भाजप आणि शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर उस्मानाबादमध्ये भाजप आणि अजित पवार गटालाही ही जागा हवी (Mahayuti Seat Sharing Issue) आहे.
सातारा लोकसभेची जागा (Lok Sabha) भाजपकडे जाणार हे जवळपास स्पष्ट आहे, परंतु अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे याही जागेचा तिढा सुटलेला नाही. अशा प्रकारे महायुतीमध्ये अकरा जागेंचा तिढा कायम असल्याचं चित्र (Lok Sabha Election 2024) आहे. लवकरच महायुती या जागेंचे उमेदवार जाहीर करेल, त्यामुळं सर्वांच लक्ष आता या मतदार संघांकडे लागलेलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.