Maharashtra Politics: हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या संपर्कात; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Nashik Lok Sabha Constituency: नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
Hemant Godse
Hemant GodseSaam Tv

अभिजीत सोनवणे साम टीव्ही, नाशिक

Maharashtra Lok Sabha Election 2024

राज्यात (Maharashtra Politics) लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच रणधुमाळी पाहायला मिळतेय. महायुतीमध्ये जागेवाटपाचा तिढा कायम असल्याचा दिसतंय. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे (Hemant Godse) ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती (Nashik Lok Sabha Constituency) मिळतेय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. (latest politics news)

हेमंत गोडसेंना तिकीट मिळत नसल्यामुळे ते पुन्हा आमच्या संपर्कात (Shiv Sena Thackeray Group) आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी केला आहे. महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू (Maharashtra Lok Sabha Election 2024) असल्यातचं दिसत आहे. या जागेवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हेमंत गोडसे पुन्हा आमच्या संपर्कात आहेत, गौप्यस्फोट नाही तर सत्यता सांगितली अशी प्रतिक्रिया बडगुजर यांनी दिली (Lok Sabha Election 2024) आहे, हवं तर CCTV फुटेज देतो असंही ते म्हाले आहेत. ते म्हणाले की, हेमंत गोडसे यांचे निकटवर्तीय आबा बोराडे आणि त्यांचे मित्र असे तीन लोकं मला भेटले आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं (Maharashtra Lok Sabha) आहे.

Hemant Godse
Maharashtra Politics: 2 कोटीच्या गाडीत फिरायचं आणि 17 रुपयांची साडी वाटायची; बच्चू कडूंचे नवणीत राणांवर टीकास्त्र

विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाशिकच्या उमेदवारीसाठी अजूनही आग्रही असल्याचं चित्र आहे. त्यामुळे ते सध्या ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे आता गोडसे बंडखोरी करणार का? असा प्रश्नही उपस्थित होत (Eknath Shinde) आहे. आता ऐन निवडणूकीच्या तोंडावर शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Hemant Godse
Maharashtra Politics: अर्जही एकाच दिवशी अन् सभेची तारीखही एकच; 'शिवाजी पार्क'साठी मनसे- ठाकरे गटात रस्सीखेच! इनवर्ड नंबरमुळे पेच सुटणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com