सुनिल तटकरे भाजपात जाण्याच्या दिशेनं आहेत असा दावा शिंदेसेना आमदाराने केला आहे.
या दाव्यामुळे ‘भाजप वॉशिंग मशीन’ची चर्चा पुन्हा रंगली आहे.
तटकरे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आहेत.
भाजपचा मित्रपक्ष शिवसेना शिंदेगटाचे आमदार महेंद्र दळवी यांचे वक्तव्य नीट, लक्ष देऊन ऐका. ऐकलंत, शिंदेगटाचे आमदार महेंद्र दळवींनी मोठा गौप्यस्फोट केलाय. आणि तोही दुसरे मित्र पक्ष असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविषयी. तटकरेंची वाटचाल कमळाच्या दिशेनं सुरु असल्याचं मोठा दावा दळवींनी नाव घेता केलाय. सुनिल तटकरे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे लोकसभेचे एकमेव खासदार आणि राज्यातील महत्वाचे नेते. त्यामुळे त्यांच्यावर भाजप प्रवेशाचा आरोप मित्रपक्षांनी का केला अशी चर्चा सुरु झाली.

आजवर ज्या नेत्यांवर भाजपनं आरोप केले त्यापैकी अनेक नेते भाजपच्या वळचणीला गेल्याचं आतापर्यंत दिसलंय. मात्र आता पुन्हा काही नेत्यांच्या भूमिका आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी हे वरिष्ठ नेते भाजपच्या वॉशिंग मशीन आरोपांची धुलाई करुन सफेदी तुझे सलाम असं म्हणण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. कोणत्या बड्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे ते पाहूयात.
या नेत्यांना हवं भाजपचं वाशिंग मशिन?
सुनिल तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी (AP)
उदय सामंत, उद्योगमंत्री, शिंदेसेना
जयंत पाटील, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी (SP)
सलील देशमुख, अनिल देखमुखांचा मुलगा
काही वर्षांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटलांनी केलेल्या विधानाची वेळोवेळी चर्चा रंगते. तर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले नेते भाजपात गेल्यानंतर विरोधक वाशिंग मशिनचा टोला भाजपला हाणल्याशिवाय राहत नाही.
सर्वच विरोधी पक्षांमधून भाजपमध्ये इनकमिंग अजूनही सुरूच आहे. विशेष म्हणजे यात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांची संख्याही मोठी आहे. मात्र आता सत्तेत असलेल्या मित्रपक्षांचे नेतेही भाजपच्या वाशिंग मशिनमध्ये आपले राजकीय भविष्य अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी आपला मोर्चा भाजपकडे वळवणार असल्याची चर्चा राजकीय विश्वात सुरू झालीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.