Nitesh Rane Claim Rohit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ब्रेकिंग! 'मंत्रिपदासाठी रोहित पवार अजितदादांच्या संपर्कात,' भाजप आमदाराच्या दाव्याने राजकारण ढवळून निघालं

Nitesh Rane Claim Rohit Pawar Contact With Ajit Pawar: मंत्रिपदासाठी रोहित पवार अजितदादांच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केलाय. त्यामुळे राजकारणात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे.

Rohini Gudaghe

विनायक वंजारे, साम टीव्ही सिंधुदुर्ग

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील वातावरण पुन्हा ढवळून निघालं आहे. नुकतेच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. केंद्रात एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळविस्तारावरून राज्यात चांगलीच रणधुमाळी रंगलेली आहे. आता भाजप आमदार यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला पेव फुटले आहे.

आमदार नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

सिंधुदुर्गमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणेंनी खळबळजनक दावा केला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) मंत्रिपदासाठी अजित पवारांच्या संपर्कात आहेत. ते अजित पवारांच्या बाजुला असतील असा दावा नितेश राणेंनी केलाय. त्यामुळे राज्यात आता पुन्हा वातावरण तापलेलं आहे. आता नितेश राणे यांच्या दाव्यात किती तथ्य आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. येणाऱ्या काळात हे चित्र स्पष्ट होणार (Ajit Pawar) आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणेंनी (Nitesh Rane) उद्धव ठाकरे गटावर टीका केली आगे. लोकांनी शिवसेनेला नाकारलं हे सत्य राणे साहेबांनी सांगितलं. त्यामुळे संजय राऊत आणि विनायक राऊत यांना मिरच्या झोबल्या. कोकणातला सामान्य मतदार हा पैसा खातो, असं राऊत आणि ठाकरेंना वाटतं का? आमचा कोकणी माणूस कधीही कोणाजवळ कर्ज मागत नाही. घेतलेले कर्ज त्वरित फेडतो, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंना कोकणातील जनता समजली नाही. उद्धव ठाकरेंच्या विकास विरुद्धप्रवृत्तीला जनतेने नाकारले. सामान्य मतदारांचा अपमान करण्याचे काम केलं जात असल्याची टीका त्यांनी केली (Maharashtra Politics) आहे. वायकरांवरून बोलताना नितेश राणेंना उद्धव ठाकरेंना पारदर्शक निकाल समजला नसल्याचं म्हटलं आहे. जिथे विरोधकांचे उमेदवार निवडूण आलेत तिथेही ईव्हीएम हॅक झालं असं म्हणायचं का? असा खोचक सवाल देखील नितेश राणेंनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

SCROLL FOR NEXT