Nitesh Rane : जिथे कमी लीड तिथे निधीही कमी देणार, तक्रार करायची नाही; नितेश राणेंचा मतदारांना इशारा

Political News : लोकसभेचे संभाव्य उमेदवार नारायण राणे यांच्यासमोरच नितेश राणेंनी सरपंच व कार्यकर्त्यांना दम भरला आहे. राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.
Nitesh Rane
Nitesh Rane Saam TV

विनायक वंजारे

Ratnagiri Sindhudurg Constituency :

मतदान झाल्यानंतर ४ जूनला मी सागळ्या सरपंचांचा हिशोब घेणार आहे. मला हवं तसं लीड मिळालं नाही तर तुम्हाला पाहिजे असलेला निधी देखील मिळाला नाही, असे झाल्यावर परत माझ्याकडे तक्रार करू नका, असा इशाराच नितेश राणे यांनी मतदारांना दिला आहे.

Nitesh Rane
Ratnagiri Sindhudurg Constituency: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीवरुन विनायक राऊतांची खाेचक टीका, राणेंचा तिस-यांदा पराभव अटळ

नितेश राणेंच्या या वक्तव्याची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. हा इशारा होती की धमकी होती? असा प्रश्न यावर विरोधक विचारत आहेत. कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना आमदार नितेश राणे यांनी असं विधान केलंय. या वक्तव्यावरून ते पुन्हा सरपंचांना सज्जड दम देत असल्याचं म्हटलं जातंय.

सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांवेळी ज्या यंत्रणा राबवल्या त्याच यंत्रणा आता देखील वापरा. तसेच राणे साहेबांना भरघोस मताधिक्याने निवडून द्या, असा इशाराच नितेश राणे यांनी कणकवली देवगड मतदारसंघातील सरपंचांना दिला आहे.

लोकसभेचे संभाव्य उमेदवार नारायण राणे यांच्यासमोरच नितेश राणेंनी सरपंच व कार्यकर्त्यांना दम भरला आहे. राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. रत्नीगीरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून अद्याप महायुतीने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र तरीही राणेंच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. त्यामुळे महायुतीचा तिढा सुटला असून रत्नीगीरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणेंनाच उमेदवारी मिळणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Nitesh Rane
Jalgaon Crime : वैष्णोदेवी मंदिरातील दानपेटी फोडली; जळगाव तालुक्यातील मध्यरात्रीची घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com