Jaykumar Gore  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मंत्र्यांचे 'कुमार' चाळे? मुंडेंनंतर महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत?

Jaykumar Gore : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत सापडलाय. विनयभंगाच्या प्रकरणावरुन भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केलाय. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

Jaykumar Gore Controversy : धनंजय मुंडेंच्या राजीनामा, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना कोर्टानं सुनावलेली शिक्षा यानंतर महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत सापडलाय. अधिवेशन सुरु असतानाच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. स्वारगेटसारखा प्रकार जयकुमार गोरेंबाबत पुढे येत असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटानं केलाय. तर पश्चिम महाराष्ट्रातील एक पैलवान मंत्री महिलेच्या मागे लागलाय, असा खळबळजनक आरोप काँग्रेसने केलाय.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडें विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गोरेंच्या प्रकरणावरुन फडणवीसांवर निशाणा साधलाय. अशी कॅरेक्टरलेस लोक फडणवीसांना मंत्रिमंडळात का हवीत ? असा सवाल त्यांनी केलाय. तर दुसरीकडे मंत्री गोरेंनी विरोधकांचा हल्लाबोल परतून लावलाय. कोर्टाने या प्रकरणात आपली निर्दोष मुक्तता केलीय, असं स्पष्टीकरण दिलंय.

बहुमताने महायुती सत्तेत आली. मात्र 100 दिवसांच्या आत मुंडेंच्या रुपानं सरकारची पहिली विकेट पडली आहे. राष्ट्रवादीचे दोन मंत्रि अडचणीत आलेले असताना आता मोठा भाऊ भाजपचे आणि फडणवीसांचे निकवर्तीय मंत्री जयकुमार गोरे अडचणीत आले आहेत. विनयभंगाचे हे प्रकरण कोणत्या वळणावर जाणार ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये शॉर्टसर्किटमुळे २ एकर शेतातील ऊस जळून खाक

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

Veg Non Veg Label: शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणवर येणार व्हेज, नॉन व्हेजच लेबल; सरकारचा नवा नियम

SCROLL FOR NEXT