Maharashtra Politics : निलंबन झाले आता आमदारकीही जाणार? औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य अबू आझमींना भोवणार?

Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबन करण्यात आले आहे. औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन त्यांची आमदारकीही जाणार असल्याचे संकेत महायुतीच्या नेत्याने दिले आहे.
Abu Azmi Aurangzeb Controversy
Abu Azmi Aurangzeb ControversySaam Tv
Published On

सचिन कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

Abu Azmi Aurangzeb Controversy : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन विधीमंडळामध्ये मोठा राडा झाला होता. विरोधकांसोबत सत्ताधारी पक्षांनीही या वक्तव्याचा निषेध केला. औरंबजेबावर केलेल्या विधानावरुन अबू आझमी याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबन करण्यात आले आहे.

अबू आझमी यांनी केलेल्या विधानावर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आज अबू आझमींच्या विरोधात कारवाई झाली आहे. विधीमंडळाने जोरचा झटका त्यांना दिला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर आमदारकी रद्द करता येते का यासाठी आम्ही विचार विनिमय करत आहेत', असे वक्तव्य गोगावले यांनी केले आहे.

औरंगजेबाबाबत वक्तव्य अबू आझमींना भोवणार असल्याचे संकेत गोगावले यांनी दिले आहे. अबू आझमी यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संताप व्यक्त केला होता. आम्ही अबू आझमींच्या विरोधात १०० टक्के कारवाई करु असे मुख्यमंत्री म्हणाले. तर चंद्रकांत पाटील यांनी आझमींच्या निलंबनाबाबतचा प्रस्ताव मांडला.

Abu Azmi Aurangzeb Controversy
Uddhav Thackeray : जे पळून गेले, त्यांनाही छावा दाखवा.. उद्धव ठाकरेंचा नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला

अधिवेशनाच्या सुरुवातीला अबू आझमी यांनी मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. औरंगजेब हा उत्तम शासक होता. चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामधील लढाई राजकीय स्वरुपाची होती. तेव्हाची लढाई ही हिंदू-मुसलमान अशी नव्हती असे वक्तव्य केले होते.

Abu Azmi Aurangzeb Controversy
Accident News : लातूर-नांदेड महामार्गावर २ भीषण अपघात; थरारक घटनांचे CCTV फुटेज पाहा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com