Bjp Appointed Sampark Mantri saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: तुमचा जिल्हा, आमची जबाबदारी! शिंदेंच्या ठाण्यात नाईक, अजित पवारांच्या बीडमध्ये पंकजा मुंडे

Bjp Appointed Sampark Mantri : सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी भाजपकडून संपर्कमंत्र्यांच्या विशेष नेमणुका करण्यात आल्या आहेत.

Ganesh Kavade

भाजप महायुतीत कंट्रोल आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. त्याच कारण म्हणजे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री असला किंवा शिवसेनेचा पालकमंत्री तरीही तेथे भाजप आपल्या एका मंत्र्यांची संपर्कमंत्री म्हणून नेमणूक करणार आहे. भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा मंत्री संपर्कमंत्री म्हणून काम पाहणार आहे.

एकनाथ शिंदे यांचा बाल्लेकिल्ला असलेल्या ठाण्यात आणि बीड जिल्ह्यातही भाजपने संपर्कमंत्र्याची नेमणूक केलीय. त्यामुळे महायुतील दोन्ही पक्षातील नेते यावर कशा प्रतिक्रिया देतात ते पाहावं लागेल. आज झालेल्या आमदारांच्या कार्यशाळेत भाजपने या नियुक्त्या केल्या आहेत. सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी भाजपकडून संपर्कमंत्र्यांच्या विशेष नेमणुका करण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक हे संपर्कमंत्री असणार आहेत. तर बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यावर संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलीय. तर संभाजीनगरमध्ये अतुल सावे संपर्कमंत्री असणार आहेत. मात्र यामुळे आधीच पालकमंत्रिपदावरून सुरू असलेला वाद अजून पेटण्याची शक्यता आहे. रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्रिपदावरून युतीत गोंधळ उडायलाय. दरम्यान भाजपने आपल्या मंत्र्यांवर संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी दिलीय. भाजपचा पालकमंत्री नसला तरी तेथे भाजपचा हस्तक्षेप असणार आहे.

जिल्हा आणि संपर्क मंत्री

गोंदिया - पंकज भोयर

रायगड - नितेश राणे

बुलढाणा - आकाश फुंडकर

यवतमाळ - अशोक उईके

वाशीम - राधाकृष्ण विखे

संभाजीनगर - अतुल सावे

बीड - पंकजा मुंडे

धाराशिव - जयकुमार गोरे

हिंगोली - मेघना बोर्डीकर

जळगाव - गिरीश महाजन

नंदुरबार - जयकुमार रावळ

मुंबई शहर - मंगलप्रभात लोढा

ठाणे - गणेश नाईक

रत्नागिरी - आशिष शेलार

कोल्हापूर - माधुरी मिसाळ

पुणे - चंद्रकांत पाटील

महायुतीत नाराजी?

सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली होती. त्यावरून महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीत गृहप्रकल्पांवर चर्चा होणार होती. यासंबंधित खाते एकनाथ शिंदे यांच्याजवळ आहे. पण तेच बैठकीला उपस्थित नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT