BMC Budget: ना कुठली करवाढ, आरोग्य, उड्डाणपुलांची कामे; मुंबईकरांना काय मिळालं? सोप्या शब्दात समजून घ्या अर्थसंकल्प

Mumbai Municipal Corporation Budget: महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी मुंबई महापालिकेचा 2025-26 या अर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.
BMC Budget
Mumbai Municipal Corporation Budgetsaam tv
Published On

देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर झाला. बीएमसीचा ७४ हजार ४२७ कोटीचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांकांनी सादर केला. आतापर्यंतचा हा सर्वात मोठ्या तरतुदीचा अर्थसंकल्प असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प १४.१९ टक्क्यांनी वाढलेला आहे.

सागरी किनारा मार्ग, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, उड्डाणपुलांच्या कामास गती आदी कामांना मंजुरी या अर्थसंकल्पातून देण्यात आलीय. आरोग्य सुविधा ते देशातलं सर्वात मोठे थीम पार्कसाठी हजारो कोटींची तरतूद या अर्थसंकल्पातून करण्यात आलीय. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय.

बीएमसीचा हा अर्थसंकल्प लोकाभिमुख, जनतेला दिलासा देणारा, विकसित भारताकडे वाटचाल करणारा असल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत. कोणतीही करवाढ, दरवाढ मुक्त आणि भुर्दंडमुक्त असा हा अर्थसंकल्प असल्याचं शिंदे म्हणालेत. मुंबईकरांना या बजेटमधून काय-काय मिळालं हे आपण जाणून घेऊ.

मुंबईकरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं?

बेस्टला १००० कोटी अर्थसहाय्य

महापालिकेच्या ठेवी ८२,८५४ कोटी

देवनार क्षेपणभूमी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती

बांधकाम व निष्कासन कचऱ्याचे संकलन, वाहतूक, प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प

मुलुंड क्षेपणभूमी येथे जमीन पुन:प्राप्त करणे.

पर्यावरण :- धूळ आणि धूर नियंत्रणासाठी पर्यावरण व्यवस्थापन आराखडा. डीप क्लिनिंग ड्राईव्ह सुरु ठेवणार. वायु प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना राबविणार

शिक्षण – महापालिकेच्या ४७९ शाळा इमारतीची दर्जोन्नटी. ४ नवीन सी.बी.एस.ई. मुंबई पब्लिक स्कूल, २२० कौशल्य विकास केंद्र कार्यरत

रुग्णालय व्यवस्थापनासाठी H.M.I.S. (Hospital Management Information System) प्रणाली कार्यरत करणार असल्याचं अर्थसंकल्पात सांगण्यात आले आहे.

रुग्णालयांचा पुनर्विकास आणि नवीन रुग्णालयांच्या बांधकामातून मुंबईत ३५१५ अतिरिक्त बेड्स उपलब्ध होणार

२५० आपला दवाखाना कार्यरत. यावर्षी अतिरिक्त २५ आपला दवाखाना सुरु होणार

नायर येथे कॅन्सर रुग्णालयाचे काम सुरू होणार आहे.

के.ई.एम. येथे आयुष्यमान शताब्दी टॉवर उभारणार

घरोघरी आरोग्य तपासणी सुरू ठेवणार

अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ प्रस्तावित केलेली नाही.

महसुली उत्पन्नात ४१० कोटीची वाढ अपेक्षित

महसुली खर्चात ७५ टक्क्यावरून ४२ टक्क्यापर्यंत कपात

भांडवली खर्चात २५ टक्क्यावरून ५८ टक्क्यापर्यंत वाढ. रु.४३००० कोटी

उत्पन्नाच्या स्त्रोतात विविध मार्गाने ३००० कोटी पर्यंत वाढ अपेक्षित

BMC Budget
BMC Budget : देशातल्या सर्वात मोठ्या महानगर पालिकेचं बजेट सादर, तब्बल 74 हजार कोटींचा अर्थसंकल्प

१) गुंतवणुकीवरील व्याज दरात अर्धा टक्का वाढ

२) प्रीमियम एफ.एस.आय. शुल्कापैकी ५० % वाटा महापालिकेस ३०० कोटी अपेक्षित

३) व्ही.एल. टी. टू लीज धोरणा अंतर्गत २००० कोटी वाढ अपेक्षित

४) अग्निशमन शुल्काद्वारे ७६९ कोटी उत्पन्न अपेक्षित

५) टोल नाक्याच्या रिकाम्या जागांचा पार्किंग व अन्य व्यावसायिक वापर

६) झोपडपट्टीतील व्यावसायिक आस्थापनावर मालमत्ता कर आकारणी

७) प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना सोलर पॅनल महापालिकेच्या मालमत्तांसाठी राबविणारा आहे.

BMC Budget
Mumbai Municipal Corporation Budget: BMC चा बजेट 'BEST'साठी ठरला 'बेस्ट'; एक हजार कोटींची तरतूद

पायाभूत सुविधांचे बळकटीकरण

१) आजतागायत १३३३ किमी रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण पूर्ण

२) यावर्षी ६९८ रस्त्यांचे काम प्रगतीपथावर तसेच फेज – २ मध्ये १४२० रस्त्यांचे काम अंतर्भूत

३) पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग महापालिकेच्या ताब्यात. येथे जलद व सुकर वाहतुकीसाठी एक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट कार्यान्वित

४) महामार्गालगत वाहनतळ उभारणार आणि डिजिटल पार्किंग अॅपद्वारे वाहनतळ आरक्षण होणार

५) दक्षिण मुंबईत बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळ (रोबोटिक पार्किंग)

६) मरीन ड्राईव्ह सागरी किनारा मार्ग पहिला टप्पा... मरीन ड्राईव्ह ते वांद्रे ९५ % पूर्ण

७) सागरी किनारा मार्ग दुसरा टप्पा..वांद्रे – वर्सोवा – दहिसर – भाईंदर काम प्रगतीपथावर

८) गोरेगांव – मुलुंड लिंक रोड प्रगतीपथावर

९) मलजल प्रक्रिया केंद्रांचे काम प्रगतीपथावर

१०) घाटकोपर व भांडूप मलजल प्रक्रिया केंद्रातून २००० एम.एल.डी. पाणी पिण्याव्यतिरिक्त उपयोगासाठी उपलब्ध होणार

११) जलबोगद्यांचे काम प्रगतीपथावर यामुळे पाणी गळती मोठ्या प्रमाणावर थांबविण्यात यश

१२) उड्डाणपुलांच्या कामास गती देणार

१३) मुंबईत विकास प्रकल्पाने बाधित ३७७८२ बांधकामांना पर्यायी जागा देण्यासाठी १०,००० सदनिका खाजगी विकासकाकडून बांधून मिळणार .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com